Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र छगन भुजबळांचे 'ते' वक्तव्य त्याला बोचले, थेट केली फोनवरून शिवीगाळ; मात्र...

छगन भुजबळांचे ‘ते’ वक्तव्य त्याला बोचले, थेट केली फोनवरून शिवीगाळ; मात्र…

Subscribe

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ‘समाज’ दिनाच्या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. ‘ब्राह्मण समाजातील लोक आपल्या मुलांची नावे संभाजी आणि शिवाजी असे ठेवत नाही’ तसेच ‘ब्राह्मण समाज इतर मागासवर्गीयांसोबत त्यांच्याच समाजातील महिलांनाही शिकण्याचा अधिकार देत नव्हता’  असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने महाराष्ट्रात मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यातच एका ब्राह्मण संघटनेने भुजबळांच्या कानाशिलात लगावणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर काही तरुण थेट फोनद्वारे शिवीगाळ अन् धमक्या देत आहेत. अशाच एका तरुणाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना कॉल करत अश्लिल शिवीगाळ करणार्‍या युवकास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी (दि.२२) संभाजीनगरमधून ताब्यात घेतले. इंद्रनील विभास कुलकर्णी (वय 44) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

मविप्र समाज दिन सोहळ्यानिमित्त मखमलाबाद शाळेच्या प्रांगणात शनिवारी (दि.१९) आयोजित कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले की, ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात. काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. आम्हाला मात्र, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले करुन दिली, असे विधान करत मंत्री भुजबळ यांनी संभाजी भिडे यांना टोला लगावला. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा नवा वाद उफाळून आला.

याप्रकरणी राज्यातील ब्राह्मण समाज आक्रमक झाला. जो तरुण छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली. दरम्यान, संभाजीनगरमधील संशयित इंद्रनील कुलकर्णी याने थेट भुजबळांच्या मोबाईल कॉल करत अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने थेट संभाजीनगरमध्ये जात संशयित कुलकर्णी यास ताब्यात घेतले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -