घरमहाराष्ट्रपुणेसामान्य शिवभक्तांसाठी छत्रपती संभाजी महाराज आक्रमक, रांगेत उभं राहून केलं भाषण

सामान्य शिवभक्तांसाठी छत्रपती संभाजी महाराज आक्रमक, रांगेत उभं राहून केलं भाषण

Subscribe

Shivjayanti 2023 | व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना छत्रपती संभाजीराजे मात्र शिवभक्तांसोबत रांगेत उभे राहून  नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढले.

Shivjayanti 2023 | पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी शिवनेरी गेलेल्या शिवभक्तांचा व्हीआयपी कल्चरमुळे हिरमोड झाला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये शिवभक्तांना रांगेतच उभे ताटकळत राहावे लागले होते. यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत शिवभक्तांसोबत रांगेतच उभे राहिले. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना छत्रपती संभाजीराजे मात्र शिवभक्तांसोबत रांगेत उभे राहून  नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढले.

शिवनेरी किल्ल्यावर आलेल्या शिवभक्तांना छत्रपतींच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली. यामुळे शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली. या सर्व शिवभक्तांनी संभाजीराजेंच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असतानाच संभाजीराजे यांनी रांगेत उभं राहत शिवभक्तांची व्यथा मांडली. सर्व सामान्य शिवभक्तांना जन्मस्थळाचे दर्शन घेतल्याशिवाय मी इथून पुढे जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेमुळे प्रशासनासह सर्वांचे धाबे दणाणले. अखेर, या प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली.

- Advertisement -

शिवनेरी किल्ला लहान आहे. मी इथून पुढे गोले तर शिवजन्मस्थळाच्या दर्शनासाठी ताटकळत असलेल्या शिवभक्तांमध्ये चेंगराचेंगरी होऊ शकते. मीदेखील दर्शन मिळेपर्यंत त्यांच्यासोबत रांगेत उभा राहीन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रम जरूर करावा, पण दुजाभाव करू नये. शिवभक्तांना किल्ल्यावर आणायचं आणि दर्शन घेऊ द्यायचे नाही, हे चूक आहे. हे दरवर्षी होतं. आम्ही किती सहन करायचे, असं भाषण त्यांनी सामान्य शिवभक्तांच्या मध्ये उभं राहत केलं. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही हे भाषण ऐकलं.

दरम्यान, संभाजीराजेंचं भाषण ऐकून घेतल्यानंतर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं. पुढच्या वर्षीपासून नियोजनपूर्वक कार्यक्रम होईल,. सर्व शिवभक्तांना जन्मस्थळाचं दर्शन घेता येईल, असं आश्वासनही देण्यात आलं.

- Advertisement -

आयोजकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले होते. मात्र, यावरून संभाजी महाराज म्हणाले की, ‘हेलिकॉप्टरचा विषयच येत नाही. मी केवळ एकावेळचा अपवाद वगळता शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांसोबत दरवर्षी चालत येतो. आम्ही राष्ट्रपतींनाही किल्ले रायगडावर हेलिकॉप्टर उतरवून दिलेले नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास समजवून घ्यायचा असेल तर नेत्यांनी-पुढाऱ्यांनीही किल्ल्यावर चालतच आले पाहिजे, असा टोला संभाजीराजे छत्रपती यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -