घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhaji Nagar : आदर्श-अजिंठा बँकेचे ठेवीदार आक्रमक, पोलिसांकडून अश्रुधूराचा मारा

Chhatrapati Sambhaji Nagar : आदर्श-अजिंठा बँकेचे ठेवीदार आक्रमक, पोलिसांकडून अश्रुधूराचा मारा

Subscribe

छत्रपती संभाजी नगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये आज (ता. 30 जानेवारी) बुडालेल्या बँकांमधील आणि पतसंस्थांमधील ठेवी परत मिळाव्या, यासाठी ठेवीदारांनी मोर्चा काढला होता. ठेवीदारांनी खासदार जलील यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्तांच्या कार्यालयावर हा धडक मोर्चा काढला होता. हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्यांनी दुपारी 3 वाजेपर्यंत शांततेत आंदोलन केले. मात्र, त्यानंतर पोलिसांमध्ये आणि ठेवीदार आंदोलकांमध्ये वाद झाल्याने आक्रमक झाले. ज्यानंतर आंदोलकांनी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाचा गेट तोडत आत प्रवेश केला. यामुळे पोलिसांनीही आंदोलकांना थांबविण्यासाठी अश्रुधूराचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar: Adarsh-Ajantha Bank depositors aggressive, police teargassed)

हेही वाचा… Raid on Lalit Tekchandani : मुंबईतील बड्या बिल्डरवर EOW ची टाच; अनेक बडे मासे अडकणार

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेत घोटाळा झाल्याचा समोर आले होते. तेव्हापासून ठेवीदारांना त्यांचे अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी जलील यांनी पाठपुरावा सुरू केला होता. परंतु, अनेक बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्याने तेथील ठेवीदारांचे देखील पैसे अडकले असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या सर्व ठेवीदारांनी जलील यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मात्र, लेखी आश्वासन मिळत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले. तसेच, जलील यांच्यासह आंदोलकांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधूराचा मारा केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली.

खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वातील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वृद्ध व्यक्तीसह पुरुष आणि महिला ठेवीदार सहभागी झालेले होते. या मोर्चामध्ये जलील यांनी भाषण केले. त्यानंतर बराच वेळ होऊनही विभागीय आयुक्तांकडून काहीच उत्तर येत नसल्याने जलील यांच्यासह ठेवीदार मोर्चेकऱ्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरले होते. यावेळी महिला आंदोलक प्रचंड आक्रमक झाल्या. याचवेळी जलील यांनी देखील गेटवरून चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि ते आतमध्ये घुसले. ज्यानंतर आंदोलकांनी देखील आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांनी आंदोलकांवर थेट अश्रुधुराचा मारा केला. त्यामुळे गोंधळ उडाला आणि आंदोलकांची पळापळ पाहायला मिळाली. यात काहीजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -