घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरकृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या! आठवड्याभरातली सातवी आत्महत्या

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या! आठवड्याभरातली सातवी आत्महत्या

Subscribe

राज्याच्या कृषीमंत्र्यांच्याच जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात तब्बल सात शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय.

राज्याच्या कृषीमंत्र्यांच्याच जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात तब्बल सात शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. खुद्द कृषीमंत्र्यांच्याच मतदारसंघात शेतकरी टोकाचे निर्णय घेत असून हा चिंतेचा विषय ठरू लागलाय.

एकीकडे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषयावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्या जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्जबाजारी आणि नापीकीला कंटाळून आत्महत्या केली. याआधी केवळ आठवडाभरात तब्बल शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं, असं असताना यावर प्रतिक्रिया देत सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असं अब्दुल सत्तार म्हणाले. त्यानंतर या वक्तव्यावरुन शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येतेय.

- Advertisement -

बोदवड येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करुन आपली जीवनयात्रा संपवली असून घाटी रुग्णालयात उपचारा दरम्यान रविवारी (12 मार्च) त्याची प्राण ज्योत मालवली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आला आहे. नंदू भिमराव लाठे (वय 28 वर्षे रा.बोदवड ता.सिल्लोड) असे या शेतकऱ्याचं नाव आहे.
तर नंदू लाठे शनिवारी (11 मार्च) रोजी शेतात कामाला जातो असे सांगून शेतात गेला. मात्र शेतात गेल्यावर नेहमी दुपारी घरी जेवणासाठी परत येणारा नंदू आलाच नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शेतात शोध घेतला. दरम्यान यावेळी तो शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याला उपचारासाठी आधी सिल्लोड व नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -