Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर ...अन् शेवटी महिलेने भीक मागून वाचवले पतीचे प्राण; नेमकं घडलं काय ?

…अन् शेवटी महिलेने भीक मागून वाचवले पतीचे प्राण; नेमकं घडलं काय ?

Subscribe

पतीच्या सिटीस्कॅनसाठी लागणाऱ्या इंजेक्शनसाठी घाटी परिसरात लोकांकडून भीक मागून एका महिलेने 300 रुपये जमा केल्याची घटना बुधवारी घडली.

औंरगाबाद: पतीच्या सिटीस्कॅनसाठी लागणाऱ्या इंजेक्शनसाठी घाटी परिसरात लोकांकडून भीक मागून एका महिलेने 300 रुपये जमा केल्याची घटना बुधवारी घडली. आधी या महिलेने कोणी मदतीला येत का यासाठी प्रयत्न केले. परंतु कोणाचीही मदत न मिळाल्यानं अखेर या महिलेने रुग्णालयाबाहेर उभं राहून भीक मागितली आणि 300 रुपये जमा केले. ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास पडताच त्यांनी या महिलेच्या मदतीसाठी धाव घेऊन लागणारे इंजेक्शन उपलब्ध करून दिलं आहे. परंतु घडलेल्या या प्रकारामुळे मात्र या महिलेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. ( Aurangabad A woman collected Rs 300 by begging people in Ghati area for her husband s CitiScan injection )

नेमकं घडलं काय?

शेख सलिमा असं घाटी परिसरात लोकांकडे पैसे मागून 300 रुपये जमा करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पती खलील शेख इब्राहिम यांचं सिटी स्कॅन करण्यासाठी आवश्यक इंजेक्शनसाठी 1 हजार 200 रुपये लागणार होते. परंतु, पैसे नसल्यामुळे गेले दोन दिवस त्या घाटीतील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात चकरा मारत होत्या. मदत मिळत नसल्यानं बुधवारी त्यांनी थेट घाटीत लोकांकडे मदत मागण्यास सुरूवात केली. महिलेची परिस्थिती पाहून काहींनी पैसे दिले. असे 300 रुपये जमा झाले. हा प्रकार के.के. ग्रुपचे किशोर वाघमारे यांच्या निदर्शनास पडला. तेव्हा ते तत्काळ या महिलेच्या मदतीसाठी धावू गेले आणि इंजेक्शन आणून दिलं.

- Advertisement -

औरंबाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय हे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यातील रुग्णांसाठी आशेचा किरण म्हणून ओळखलं जातं. यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात, मात्र अनेक वेळा रुग्णांना घाटी रुग्णालयामध्ये औषधं उपलब्ध नसल्याचं कारण सांगितलं जातं. यामुळे अनेक गरजू रुग्णांना अडचणीला सामोरं जावं लागतं.

(हेही वाचा: दिमाखदार स्वागताने पंकजा मुंडे भारावल्या; शिव-शक्ति परिक्रमेचा नाशिक टप्पा प्रचंड यशस्वी )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -