Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरVIDEO : संभाजीनगरमध्ये बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे किडनॅपिंग, अपहरणकर्ते फोन करून...

VIDEO : संभाजीनगरमध्ये बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे किडनॅपिंग, अपहरणकर्ते फोन करून म्हणाले, ‘बच्चा चाहिए तो…’

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : दोन कोटी रूपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा 7 वर्षीय मुलगा चैतन्य यांचे कारमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले. ही घटना मंगळवारी रात्री 8.45 वाजता एन – 4 येथील ही घटना घडली. अपहरण झाल्यानंतर 15 मिनिटांनी अज्ञातांनी सुनील यांना फोन करून खंडणी मागितल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

सुनील तुपे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे बंधू वरिष्ठ शासकीय अधिकारी आहेत. सुनील हे कुटुंबासह एन-4 मधील सेक्टर एफ-1 मध्ये वास्तव्यास आहेत. मंगळवारी सुनील हे दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते. तेव्हाच, चैतन्यचे अपहरण झाले आहे.

हेही वाचा : अजितदादांच्या ‘NCP’त पुन्हा प्रवेश करण्यापूर्वीच संजीवराजे नाईक-निंबाळकरांच्या घरावर ‘इन्कम टॅक्स’ची रेड

अपहरणाआधी त्यांनी सुनील यांचे निवासस्थान आणि आसपासच्या परिसराची रेकी केली होती. मंगळवारी अपहरणकर्ते सोयायटीत दुसऱ्या मार्गाने प्रवेश करत थेट सुनील यांच्या घरापर्यंत पोहोचले. तेव्हा, सुनील लहान मुलांसोबत काही अंतरावर खेळत होते. त्याच रस्त्यावर चैतन्य सायकल खेळत होता. तो एकटाच मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताच अपहरणकर्त्यांनी त्याच्या मागे जात हेतू साध्य केला.

असे झाले अपहरण…

मंगळवारी घरी परतल्यावर सुनील तुपे दोन मुलांसह सोसायटीत खेळत होते. चैतन्यचा लहान भाऊन वडिलांसोबत होता. चैतन्य सायकलवरून घरापासून एन-4 रस्त्याच्या दिशेने जात असताना मागून काळ्या रंगाची कार आली. त्याच्या सायकलच्या बाजूलाच अपहरणकर्त्यांनी कार उभी केली. चालकाच्या मागील बाजूने दोघे उतरले. एकाने चैतन्यला उचलून चालकाच्या डाव्या बाजूने कारमध्ये कोंबले. दुसऱ्याने सायकल चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन फेकली. त्यानंतर अपहरणकर्ते चैतन्यला घेऊन हनुमान चौकाच्या दिशेने सुसाट निघून गेले.

सुनील हे मात्र चैतन्य लांब गेला असेल, या शंकेने परिसरात शोधत निघाले. तेवढ्यात त्यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल. अपहरणकर्त्यांकडे आधीच सुनील यांचा नंबर होता. कॉलवरील व्यक्तीने त्यांना आधी मराठी व नंतर हिंदीतून ‘बच्चा चाहिए तो 2 करोड देना पडेंगे’ असे धमकावले

यानंतर तुपे कुटुंबाने पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशावरून जवळपास 30 पोलिस अधिकारी, 120 पेक्षा अधिक अंमलदार, सर्व ठाण्यांची डीबी पथके, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबरचे अधिकारी रस्त्यावर उतरले. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून अपहरणकर्त्यांचा माग काढला जात होता.

रात्री उशिरापर्यंत परिसरातील बांधकाम साइटवरील मजूर, तुपे यांच्या बांधकाम साइटवरील कामगार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिस माहिती घेत होते. सुनील यांना कॉल केल्यानंतर अर्ध्या तासातच अपहरणकर्त्यांचा मोबाइल पाल फाट्याच्या पुढे बंद झाला. हनुमान चौक ते कामगार चौकातून सिडको चौक व पुढे जळगाव रोडच्या दिशेने हर्सल सावंगीच्या दिशेने कार गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : घोटाळा-टोणा’ करुन 76 लाख मतदान वाढवले; शिवसेना ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला टोला