घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरMuslim to hindu Conversion: मुस्लीम कुटुंबाने स्वीकारला हिंदू धर्म; आधी 'शेख' आता...

Muslim to hindu Conversion: मुस्लीम कुटुंबाने स्वीकारला हिंदू धर्म; आधी ‘शेख’ आता झाले ‘आर्य’

Subscribe

छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमामध्ये मुस्लीम कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. अहमदनगरमधील एकाच कुटुंबातील 9 सदस्यांनी बुधवारी शास्त्रींच्या हस्ते हिंदू धर्माची दीक्षा घेतली.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमामध्ये मुस्लीम कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. अहमदनगरमधील एकाच कुटुंबातील 9 सदस्यांनी बुधवारी शास्त्रींच्या हस्ते हिंदू धर्माची दीक्षा घेतली. लहानपणापासूनच आपण हिंदू धर्मानुसार पूजापाठ करत असून सनातन धर्मावरील श्रद्धेमुळे हे धर्मांतर करत असल्याच्या भावना शेख कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. (Chhatrapati Sambhajinagar Muslim to hindu Conversion Muslim family converted to Hinduism First Sheikh now Arya)

धर्मांतरानंतर या कुटुंबातील नावं देखील बदलण्यात आली आहेत. जमील शेख आता शिवराम बनले आहेत. त्यांची पत्नी अंजुम हीचं नाव सीता, मुलीचं नाव प्रेरणा तर मुलांची नावं कृष्णा आणि बलराम अशी ठेवण्यात आली आहेत.

- Advertisement -

शिवराम आर्य पूर्वीचे जमील शेख म्हणाले की, माझे आजी- आजोबा, आई-बाबा म्हणायचे की आपला धर्म सनातन आहे. कोणी काहीही बोलू दे परंतु आपण देवाची पूजा करायची. त्यामुळे माझी बऱ्याच दिवसांपासून धर्मपरिवर्तन करण्याची इच्छा होती. मी माझ्या मित्राला घरवापसी करायची असल्याचं सांगितलं आणि आज अखेर धर्मपरिवर्तन केलं.

धर्मपरिवर्तन केल्यानंतर खूप आनंद झाला आहे. एकप्रकारचा अभिमान आहे आणि गर्वाने मला जय श्री राम म्हणायला आवडेल, असंही शिवराम म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली होती, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

- Advertisement -

शिवराम हे नावं कसं ठरवलं?

शिवराम नावं कसं ठेवलं यावर बोलताना ते म्हणाले की, मला कोणीही बोलवताना शिव किंवा राम अथवा शिवराम नावानं आवाज द्यावा, असं मला वाटत होतं तसंच, जे कोणी इश्वराचं नाव घेत नाहीत, त्यांनाही ते घ्यावं लागेल म्हणून मी या नावाची निवड केली, असं शिवराम यांनी यावेळी म्हटलं.

मला कधीही अडचण आली नाही

मुस्मीम धर्मगुरूंकडून किंवा तुमच्या नातेवाईकांकडून धर्मपरिवर्तन केल्यानंतर तुम्हाला काही अडचणी आल्या का, असा प्रश्न विचारला असता शिवराम यांनी म्हटलं की, माझं घरं हे प्रभू चालवतात. त्यामुळे दुसरं कोण काय बोलंत याकडे मी अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण आली नाही, असं शिवराम म्हणाले.

(हेही वाचा: पंतप्रधान मोदी सगळे निर्णय अदानींच्या फायद्यासाठी घेतात; राहुल गांधींचा घणाघात )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -