छत्रपती संभाजीनगर – ग्राहकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार सेवा मिळावी यासाठी पुरवठा विभाग वजन मापे नियंत्रण, अन्न व औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन, महावितरण आणि महापालिका या विभागाने समन्वयाने काम करण्याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीस परिवहन विभागाचे संदीप गोसावी ,अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे, राज्य परिवहन विभागाचे पंढरीनाथ चव्हाण, आरोग्य विभागाचे जी एम कुंडलीकर, कृषी विभागाचे विष्णू खरवडे, पोलीस अधीक्षक ग्रामीणचे प्रतिनिधी, महावितरण विभागाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. परिषदेच्या अशासकीय सदस्य धनंजय मुळे यांनी ज्याप्रमाणे जिल्ह्याचां लोकशाही दिन आयोजन नियमित केले जाते त्याचप्रमाणे तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करून सर्वसामान्य ग्राहकांचे प्रश्न तालुकास्तरावर सोडवण्यात नानक वेदी यांनी शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी एक खिडकी योजनेच्या अंतर्गत उपचारासाठी लागणाऱ्या सुविधेमध्ये रेशनकार्ड संबंधित आयुष्यमान कार्ड काढण्याबाबत अडचणी येतात त्या दूर करण्यासाठी मदत कक्षात एका व्यक्तीमार्फत निवड करून नेमणूक करण्याबाबतचे मागणी यावेळी करण्यात आली.
अनवर अली सय्यद यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अमली पदार्थाचे वाहतूक आणि विक्री होत असून यावर योग्य नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळोवेळी कारवाई करणे आवश्यक आहे .याबाबत आवश्यक असलेले सहकार्य स्थानीक यंत्रणांनी करण्यात येत असून यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सोयगाव तालुक्यातील पंढरी गाव येथील वीजपुरवठा बाबत तक्रारीचे निराकरण बाबतची चर्चा करण्यात आली तसेच. क्रीडा संकुल येथील कार्यरत सुरक्षारक्षकाचे वेतन प्रलंबित असल्याने त्यांना वेतन देण्याची मागणी क्रीडा अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असल्याबाबत सांगण्यात आले. यावर योग्य ते कारवाई करण्याचे निर्देश या संबंधित विभागांना देण्याचे सुचित करण्यात यावे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेशित झालेल्या मुलांना पोषण आहार शाळेत मिळतो किंवा नाही याबाबतही तपासणी प्रशासनामार्फत करण्यात यावी अशी मागणी अशासकीय सदस्यांमार्फत करण्यात आली. शासनाच्या विविध योजना विषयी विभागामार्फत शिबिराचे आयोजन तालुकास्तरीय विविध गावात केले जाते, या शिबिराच्या वेळेस अशासकीय सदस्यांना ही निमंत्रित करण्यात यावे जेणेकरून याची मदत प्रशासनास योजनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी होऊ शकते. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या जाणीव जागृतीसाठी प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ग्राहकांचा सहभाग यामध्ये असणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. अशासकीय सदस्यांमध्ये अमोल चतुर, अन्वर अली सय्यद ॲड. सिद्दिकी सोफियान रावसाहेब नाडे, शिवहरी मुंडे, राजेश मेहता, संगीता धारूरकर या समिती सदस्यांची उपस्थिती होती
हेही वाचा : VBA : मनोज जरांगेची मागणी मान्य करणार, प्रकाश आंबेडकरांनी या अटीवर दर्शवली पाठिंब्याची तयारी
Edited by – Unmesh Khandale