शेतकऱ्यांचे गंगापूर बाजार समितीत कांद्याचा दशक्रियाविधी करून मुंडन आंदोलन

शेतकऱ्यांनी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्यावतीने कांद्याचा दशक्रियाविधी करून मुंडण आंदोलन करण्यात आले.

Farmers Mundan Andolan in Gangapur Bazar Samiti by performing the Dashakriya ritual of onion
Farmers Mundan Andolan in Gangapur Bazar Samiti by performing the Dashakriya ritual of onion

छत्रपती संभाजी नगर: गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी गणेश गणगे यांच्या कांद्याला एक रुपया पाच पैसे दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत टाकून कांद्याचा अंत्यविधी केला होता. कांद्याला आठ रुपये भाव द्यावा, तो दिल नाही तर कांद्याचा दशक्रिया विधी करून मुंडन आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी आज, 12 मेला सकाळी, बारावाजेदरम्यान आंदोलन केले.  ( Farmers Mundan Andolan in Gangapur Bazar Samiti by performing the Dashakriya ritual of onion )

शेतकऱ्यांनी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांच्यावतीने कांद्याचा दशक्रियाविधी करून मुंडण आंदोलन करण्यात आले. गंगापूर बाजार समिती प्रशासनाच्यावतीने आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना समाधानकारक कांदा शेतमालाची रक्कम देण्यात आल्याने व यापुढे शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता बाजार समिती घेईल या लेखी आश्वासनाने हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी भाऊसाहेब शेळके, महेश गुजर, संपत रोडगे, गणेश गनगे, बाळासाहेब जाधव, संकेत मैराळ, भाऊसाहेब गवळी, सुनील बोराटे, देविदास पाठे, आदींची उपस्थिती होती.

( हेही वाचा: उच्चशिक्षित भामट्याचा प्रताप, बी.ए., बी.कॉम.सह ITIच्या पदव्यांची विक्री )