घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरभांडखोर बायका सात सेकंदही नको; पत्नी पीडित पुरुषांकडून पिंपळ पौर्णिमा साजरी

भांडखोर बायका सात सेकंदही नको; पत्नी पीडित पुरुषांकडून पिंपळ पौर्णिमा साजरी

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : बायका उद्या (3 जून) वटपौर्णिमेनिमित्त आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना दिसतील, मात्र त्याआधीच पत्नी पीडित पुरुषांनी छत्रपती संभाजीनगर येथील वाळूजमध्ये पिंपळ पौर्णिमा साजरी करत निषेध व्यक्त केला आहे. (Pimpal Poornima is celebrated by wife suffering men)

वट पौर्णिमेनिमित दरवर्षी बायका हाच पती सात जन्म मिळावा यासाठी वडाला फेऱ्या मारताना साकडे  घालताना दिसतात. पण वट पौर्णिमेच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर येथील पत्नी पीडित आश्रमचे सभासद पिंपळ पौर्णिमा साजरी करून पुरुषांच्या समस्यांकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळीही पीडित पुरुषांनी भांडखोर बायका सात जन्मच काय सात सेकंदही नको, असे म्हणत पिंपळ पौर्णिमा साजरी केली.

- Advertisement -

पीडित संघटनेचे तथा आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मनाळ, चरणसिंग गुसिंगे, भिकन चंदन, संजय भांड यावेळी उपस्थित होते. दरवर्षी वट पौर्णिमेच्या एक दिवस आधी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारता याव्यात, यासाठी भारत फुलारे यांनी आश्रमाच्या परिसरात पिंपळाच्या झाडाची लागवड  केली आहे.

पुरुषांना कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे
पीडित पुरुषांचे म्हणणे आहे की, दिवसेंदिवस पुरुषांवरील अन्यायात वाढ होत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले, परंतु सदर कायदे बनवताना पुरुषांवर अन्याय होऊन ते पीडित होतील याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सध्याच्या काळात पुरुष हतबल होऊन पीडित झाले आहेत. त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेले एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे पीडित पुरुषांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

पत्नी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतात
एक पुरुष मोठ्या आशा उराशी बाळगून मोठ्या उत्साहाने लग्न करतो, पण लग्न झाल्यावर त्याच्या स्वप्नाचे तुकडे तुकडे होणार हे त्याला माहित नसते. बहुतेक वेळेला लग्न झाल्यावर पतीशी कारण नसताना भांडण करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय काही बायका पतीचा बुजगावण्यासारखा वापर करतात. लग्नाचा शिक्का मारल्यावर त्यांना नवऱ्याची संपत्ती हवी असते, मात्र त्यांना पती आणि त्याचे नाव नको असते. जर तिला संपत्ती मिळत नसेल तर ती पतीसोबत आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर केस करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, असे पीडीत पुरुषांचे मत आहे.

पीडीत पुरुषांच्या प्रमुख मागण्या
1. पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग बनवावे.
2. पुरुष सबलीकरणासंबंधीत एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी.
3. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पुरुष दक्षता समिती स्थापन करावी.
4. जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे.
5. कौटुंबिक वाद न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -