राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार; धमकी देत घरी बोलावून दिले गुंगीचे औषध

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कायकर्त्याने (NCP activist) विवाहित महिलेला पाठलाग करत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) समोर आली आहे. या कार्यकर्त्यांने महिलेला धमकी देत आधी घरी बोलावले आणि नंतर गुंगीचे औषध पाण्यात टाकून तिच्यावर अत्याचार केला.

छत्रपती संभाजीनगर येथील नूर कॉलनी परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने विवाहित महिलेला गुंगीचे औषध देत तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गीक अत्याचार केला आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्यावर अत्याचार करताना व्हिडिओ बनवत महिलेला ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये (City Chowk Police Station) राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा शहर उपाध्यक्षाच्या (City Vice President of Nationalist Congress Party) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्तार खान उर्फ बब्बू (४२) (Muktar Khan) असे आरोपी उपाध्यक्षाचे नाव आहे. आरोपी नूर कॉलनी टाऊन हॉल या ठिकाणी वास्तव्यास आहे, तर पीडित महिला सिटी चौक भागामध्ये पती व मुलांसह राहते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहर उपाध्यक्ष व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत असलेला मुख्तार खान याची नजर मार्च महिन्यामध्ये पिडित महिलेवर पडली. त्यानंतर मुख्तार याने महिलेचा पाठलाग करायला सुरुवात केली. तो पिडित महिला घरातून बाहेर पडण्याची नेहमी वाट बघायचा आणि त्यानंतर तिचा पाठलाग करताना मुले आणि पतीला अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत होता.

महिला धमकीला घाबरत असल्याचे लक्षात आल्यावर मुख्तारने पुन्हा एकदा १२ मार्च रोजी पिडित महिलेला धमकी देत टाऊन हॉल येथील त्याच्या घरी बोलावले. धमकीला घाबरल्यामुळे पिडित महिला त्याच्या घरी गेली. यावेळी मुख्तारने पाण्यामध्ये गुंगीचे औषध टाकून तिला दिले. त्यानंतर आरोपी नरेंद्र मारुतीने महिलेवर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केले आणि अत्याचार करतानाचा व्हिडिओ तयार केले. यानंतर अत्याचाराची कुठे वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही आरोपीने पिडित महिलेला दिली होती.

घडलेल्या सर्व प्रकारामुळे पिडित महिला प्रचंड घाबरली होती, पण तिने घरी आल्यानंतर नातेवाईकांना घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर नातेवाईकांनी महिलेला धीर देत तात्काळ सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.