जालना : 2016 मध्ये मराठा समाजाचे शांततेत 58 मोर्चे निघाले. याचे साक्षीदार जग आहे. पण काल जे घडले ते सरकारच्या माध्यमातून अमानुष कृत्य आहे, असे म्हणत छत्रपती संभाजी महाराज यांनी जालन्यातील घटनेवर संताप व्यक्त केला. आज सकाळीच संभाजी महाराज हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या अंतरवाली सराटी गावात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांची भेट घेत काल घडलेल्या घटनेबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य करण्याचे आदेश दिले, त्याचे निलंबन झाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे सांगितले. (Chhatrapati Sambhaji Raje aggressive stance after the incident in Jalna Maratha Protest)
हेही वाचा – Jalna Lathi Charge : सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका, चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना आवाहन
यावेळी बोलताना छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, जालन्यात घडलेले कृत्य हे सरकारच्या माध्यमातून घडविण्यात आलेले अमानुष कृत्य आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाजार यांचा वंशज म्हणून इथे आलो आहे. पहिल्यांदा छत्रपती शाहू महाजांनी आरक्षण दिले होते. मराठा समाजावर अन्याय होत असल्याने मी अनेक दिवसापासून लढत आहे. 2016 मध्ये मराठा समाजाचे शांततेत 58 मोर्चे निघाले. याचे साक्षीदार जग आहे. पण काल जे घडले ते सरकारच्या माध्यमातून अमानुष कृत्य घडवल्याचे संभाजीराजांकडून सांगण्यात आले.
शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या राज्यात असे होत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि दुसऱ्या बाजूला आंदोलकांवर गोळ्या झाडता. हे काय मोगलांचे, निजामांचे राज्य आहे का? असे जर होत असेल तर शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून सांगतोय की, मराठ्यांवर गोळी घालायची असेल तर पहिली गोळी माझ्यावर घाला. हे मी आधीपण बोललो होतो आणि आता पण सांगतोय. जर आंदोलकांवरचे गुन्हे सरकारने मागे घेतले नाहीत आणि ज्या माणसाने हे कृत्य करण्याचे आदेश त्याचे निलंबन झाले नाही तर मी गप्प बसणार नाही, असा इशाराही संभाजी महाराजांकडून देण्यात आला आहे.
तुमचे सरकार दिल्लीत आहे, महाराष्ट्रात आहे, आम्हाला सांगा आणखी किती दिवस आरक्षणाचा लढा द्यायचा? आम्हाला आरक्षण कसे देणार ते पहिले सांगा? आंदोलकांवर गोळ्या घालायला हे काय पाकिस्तानचे लोक आहेत का? ते काय दहशतवादी आहेत का? असे सवाल संभाजी महाराजांकडून उपस्थित करण्यात आले. आंदोलन करणारी सगळी लोकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आहेत. मी कधीही राजकारण केले नाही मी समाजकारण केले आहे. गरीब मराठा समाजाला कधी न्या मिळवून देणार हे पहिले सांगा, असेही त्यांच्याकडून सरकारला विचारण्यात आले.