नाशकात साकारली छत्रपती संभाजीराजेंची विश्वविक्रमी मुद्रा

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष दिनेश बबनराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून संभाजी महाराज यांची १६ फूट उंच 12 फूट रुंद आणि ४५० किलो वजनाची भव्य मुद्रा साकारण्यात आली आहे. या मुद्रेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे तसेच त्याचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही मुद्रा साकारण्यात आली आहे. या मुद्रेचा लोकार्पण सोहळा खासदार हेमंत गोडसे , शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे ,अजय बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ही मुद्रा ४५० किलो वजनाची आहे. ४ इंच जाड आणि १६ फुट उंच आणि १२ फुट रूंद असलेले मुद्रा आनंद सोनवणे यांनी साकारली आहे. जुने नाशिक परिसरातील संभाजी महाराज यांच्या पुतळयाजवळ ही मुद्रा ठेवण्यात येणार आहे. मुद्रा तयार करण्यासाठी फायबर आणि लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. यावेळी संजय चव्हाण, प्रथमेश गीते, बाळासाहेब कोकणे, सचिन बांडे, उमेश चव्हाण, योगेश बेलदार, राजेंद्र क्षीरसागर, अमोल सूर्यवंशी , संजय भांगरे, राजेंद्र देसाई, गणेश बर्वे ऋतुराज पांडे, जगदीश शेजवळ, नाना काळे, संजय परदेशी, गणेश तांबे, नाना निकम, अजय भांगरे, विशाल गवांदे, हिरामण वाघ, गज्जू घोडके, नितीन कोळपकर, पवन मटाले, विजय ठाकरे, किरण शिरसागर, निखिल जाधव, मनोज कोते, संभाजी महाले, अमोल साळी,आदि उपस्थित होते.

छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास, पराक्रम आजच्या नव्या पिढीला समजावा या उददेशाने ही मुद्रा साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा सर्वांना ज्ञात आहे मात्र अनेकांना संभाजी महाराजांची मुद्रा माहित नाही, ती सर्वांपर्यंत पोहचावी या उददेशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
दिनेश चव्हाण, अध्यक्ष, संभाजी मित्रमंडळ