घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर नामांतर : समर्थनासाठी ४ लाख तर, विरोधात २ लाख अर्ज;...

छत्रपती संभाजीनगर नामांतर : समर्थनासाठी ४ लाख तर, विरोधात २ लाख अर्ज; पुढे काय होणार?

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या मंजूरीनंतर राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात केले होते. मात्र या निर्णयावर 27 मार्चपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते. नामांतरावर आक्षेप घेण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत नामांतराच्या समर्थनार्थ ४ लाख तर, विरोधात २ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.

औरंगाबाद जिलह्याचे संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव २९ जून २०२२ रोजी मंजूर केला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकराने उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे हा प्रस्ताव केंद्रकाकडे पाठवण्यात आला आहे. केंद्राने मंजूरी दिल्यानतंर १७ जुलै २०२२ रोजी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने अधिसूचना काढून औरंगाबाद जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशीव’ असे केले होते.

- Advertisement -

एमआयएम या पक्षाने नामांतराला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून याविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले होते. एमआयएमसह अनेक संघटनांनी नामांतराला विरोध दर्शवला आहे. या संघटनांच्या वतीने एका दिवसांत १ लाख २० हजार ९०७ हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ एकूण ४ लाख ३ हजार १५ अर्ज प्राप्त झाले आहेत तर, विरोधात २ लाख ७३ हजार २१० हरकती प्राप्त झाल्या आहेत. धाराशिव नामांतराच्या समर्थानार्थ ११७ तर विरोधात २८ हजार ६१४ अर्ज मिळाले आहेत.

- Advertisement -

सोमवारपर्यंत प्राप्त झालेल्या अर्दांची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर त्याची संगणकावर नोंदणी केली जाईल. या कामासाठी १५ दिवसांचा कालवाधी लागू शकतो. त्यानंतर, शासनाच्या सूचनेनुसार कागदपत्रे मंत्रालयात पाठवली जाणार आहेत, अशी माहिती महसूल उपायुक्त पराग सोमवण यांनी दिली.

नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. यासाठी शहरातील चौका-चौकात कॅम्प देखील लावण्यात आले. तसेच वेगवेगळ्या बैठका घेऊन अर्ज दाखल करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -