वडील अभ्यासावरुन ओरडल्याचा राग, १७ वर्षांच्या मुलानं संपवलं जीवन

अभ्यास करण्यावरून वडील चिडले. याचा राग मुलाच्या डोक्यात बसला आणि त्याने आपलं जीवन संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.

Suiside
अभ्यास करण्यावरून वडील चिडले. याचा राग मुलाच्या डोक्यात बसला आणि त्याने आपलं जीवन संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.

शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघड झाली आहे. अभ्यास करण्यावरून वडील चिडले. याचा राग मुलाच्या डोक्यात बसला आणि त्याने आपलं जीवन संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. घरात एक चिठ्ठी आढळून आली असून पोलीस पुढील तपास सुरु आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरातील स्वानंदनगर भागात हे कुटूंब राहत होते. १७ वर्षीय शार्दूल शंकर कोपळकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो देवगिरी महाविद्यालयात अकरावीच्या कॉमर्सच्या वर्गात शिक्षण घेत होता. गेल्या अनेक दिवसापासून त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. तो अभ्यास करत नाही या कारणावरुन त्याचे वडील रागावले. वडील रागवल्यामुळे त्याला प्रचंड मनस्ताप झाला. याचा त्याला इतका राग आला की आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय त्याने घेतला.
सुरूवातीला त्याने एक सुसाईट नोट लिहून मग गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केली. सोमवारी रात्री जेव्हा आपल्या मुलाने गळफास घेतल्याचं दिसून आलं त्यावेळी कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

शार्दूलचे वडील हे बांधकाम कामगारांचा पुरवठा करणारे ठेकेदाराचं काम करतात. त्यांना आणखी दोन मोठ्या मुली देखील आहेत. शार्दूलने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, “सॉरी आई- बाबा, मला माफ करा. आपल्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही.”

या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.