…उत्साही कार्यकर्त्यांमुळे शिवप्रतिमेला धक्का

या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अमोल मिटकर यांनी देखील टीका केली आहे

chhatrapati shivaji maharaj image fell down in cm eknath shinde programme jalgaon

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. शिवसेना एकनाथ शिंदे यांनी 40 हून आमदारांसह बंड केला. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेविरुद्ध एकनाथ शिंदे असा नाव वाद उफाळून आला आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आता स्थापन झाले आहे. या नव्या सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी शक्तीप्रदर्शन आणि मेळाव्यांसाठी आमंत्रित केले जात आहे. शिंदे गटातील आमदार, कार्यकर्त्यांकडून या मेळाव्यांचे आयोजन केले जातेय. सकाळपासून ते मध्यरात्री उशीरापर्यंत हे मेळावे सुरु आहेत.

हेही वाचा : पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत राणे बंधूंचा ठाकरेंना सावधानतेचा इशारा

जळगावात रविवारी अशाप्रकारे एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. जळगावातील पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी या मेळाव्याचं आयोजन केले होते. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. जळगावातील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुथ बाळासाहेब ठाकरे यांचा प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.


परंतु मेळावा संपताच काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर धाव घेत गर्दी केली, या गर्दीमुळे काही काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळात व्यासपीठावर असलेल्या महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला धक्का लागला. या घटेनेचा व्हिडीओ उपस्थित कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केला, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर आता शिवप्रेमींसह आता विरोधकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अमोल मिटकर यांनी देखील टीका केली आहे. मिटकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत म्हटले की, राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादन होत असेल कर जनता सहन करणार नाही.


पंढरपूर श्री विठ्ठल आश्रमातील 40 भाविकांना जेवणातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू