Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रPrashant Koratkar : शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पुन्हा दिलासा; कोर्टात काय झाले

Prashant Koratkar : शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पुन्हा दिलासा; कोर्टात काय झाले

Subscribe

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाकडून पुन्हा एकदा दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत
प्रशांत कोरटकर याने सावंतांना दिलेल्या धमकी प्रकरणी आज कोल्हापूर न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरला कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 17 मार्चला होणार आहे.

सरकारी वकील म्हणाले, नव्या न्याय संहितेचा कोरटकरला फायदा 

भारतीय न्याय संहिता नुसार प्रत्यक्ष हजर राहण्याची तरतूद नाही. नवीन कायद्यात सुधारणा केली आहे. मात्र याचा तपासावर कोणताही परिणाम होणार नाही. जामीनाच्या मुद्द्यावर अंतिम सुनावणी होईपर्यंत अटक करता येणार नाही. व्हीसीद्वारे देखील प्रशांत कोरटकरला उपस्थित राहण्याचे बंधन नाही. नवीन कायद्यानुसार तरतूद नाही तर मागणी करून उपयोग काय? असं सरकारी वकील विवेक शुक्ल म्हणाले.

आधी अंतरिम जामीन आता कोर्टात हजर राहण्याची गरज नाही… 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धकमी देणारा प्रशांत कोरटकर याच्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी तो चिल्लर माणूस असे म्हटले होते. मात्र त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. दुसरीकडे न्यायालयातूनही कोरटकरला दिलासा मिळाला आहे.

प्रशांत कोरटकरविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. याआधी कोरटकराल कोल्हापूर न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान पोलिसांनी कोर्टाला विनंती केली होती की, सुनावणीवेळी प्रशांत कोरटकला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना द्या. मात्र, पोलिसांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, जामीन अर्जावरची सुनावणी आता 17 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे 17 मार्चपर्यंत प्रशांत कोरटकरला दिलासा मिळाला. प्रशांत कोरटकरने त्याचा मोबाईल पोलिसांकडे जमा केला आहे, मात्र त्यात कोणताही डेटा नाही. जो डेटा इरेज करण्यात आला, तो डेटा मिळवण्यासाठी प्रशांत कोरटकर आवश्यक आहे, असं पोलिसांनी म्हटलं होतं. मात्र, पोलिसांचं म्हणणं कोर्टाने फेटाळून लावल आहे.

हेही वाचा : Beed Crime : बीडचं राजकारण नासलं; बीडचे नेते उद्या फ्री स्टाईल करतील, तलवारी, बंदुका काढतील, एकमेकांचे बळी घेतील