Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत मिळणार; सरकार ब्रिटनसोबत करणार करार

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत मिळणार; सरकार ब्रिटनसोबत करणार करार

Subscribe

शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला होता ती ऐतिहासिक वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. आता ही वाघनखं भारतात येण्याची तयारी सुरू झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला होता, ती वाघनखं म्हणजे भारतीयांसाठी नेहमीच अभिमानाची वाटत राहिली आहेत. तिच वाघनखं आता भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचा सेनापती अफझल खान याचा वध करण्यासाठी वाघनखांचा वापर केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची तिच वाघनखं आता भारताला परत करण्याचं ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे. याबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून या महिन्याच्या अखेरीला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासोबत सामंजस्य करार करण्यासाठी लंडनचा दौरा करणार आहेत. याबाबत योग्य तो करार झाला तर या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराज यांची ती ऐतिहासिक वाघनखं मायभूमीत परत येणार आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj s tiger paw will be returned The government will make an agreement with Britain Sudhir Mungantiwar )

शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला होता ती ऐतिहासिक वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. आता ही वाघनखं भारतात येण्याची तयारी सुरू झाली आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून एक पत्र मिळालं आहे. यात त्यांनी वाघनखं परत देण्याचं मान्य केलं आहे. ऑक्टोबर रोजी आम्ही लंडनला जाणार असून ऑक्टोबरला करार होईल. नोव्हेंबरमध्ये ही वाघनखं हिंदुस्थानमध्ये येतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

- Advertisement -

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही सुरुवातीला ही वाघनखं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नेण्याचं ठरवलं होतं. मात्र, या करारानुसार, आम्हाला तसं करता येणार नाही. ही वाघनखं एकाच जागी ठेवावी लागणार आहेत. महाराष्ट्र, देशभरातून येणारे मावळे ते पाहू शकतील, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसंच वाघनखं ही फक्त एक वस्तू नसून ती आमच्या आस्थेचा विषय आहेत, असंही ते म्हणाले.

(हेही वाचा: ‘यशवंत मंडई’ बहुमजली पार्किंगसाठी आता भाजपाही आग्रही, आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -