घरमहाराष्ट्रचलनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा; भाजप आमदार नितेश राणेंची मागणी

चलनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा; भाजप आमदार नितेश राणेंची मागणी

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर (indian note)  लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो लावण्याची मागणी केली. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर देशातील विविध भागातून नोटांवरील फोटोंबाबत वेगवेगळ्या मागण्या सुरु झाल्या आहेत. यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे (bjp mla nitesh rane)  यांनी नोटांवर मराठी साम्राज्याचे प्रतिक छत्रपती शिवरायांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. यासोबत त्यांनी 200 रुपयांच्या नोटेचा फोटोशॉप केलेला फोटोही पोस्ट केला आहे. नितेश राणे यांनी फोटो ट्विट करत म्हटले की, हे परफेक्ट आहे. (chhatrapati shivaji picture on indian note now bjp mla nitesh rane demands)

गुजरात निवडणुकीपूर्वी दिल्लाचे आमदार अरविंद केजरीवाल हे यातून हिंदु कार्ड खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. नोटांवर लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या फोटो छापावा, अशी मागणी केजरीवालांनी केली होती. यातून अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी येत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन थांबण्यासही मदत होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. केजरीवाल्यांच्या या मागणीनंतर आता भाजपतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

भाजपने म्हटले की, केजरीवाल आपल्या सरकारच्या त्रुटी आणि आम आदमी पक्षाच्या हिंदुविरोधी मानसिकतेपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय खेळी करत आहेत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले की, केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत जे काही सांगितले ते त्यांच्या यू-टर्न राजकारणाचा आणखी एक विस्तार आहे. यातून त्यांचा ढोंगीपण दिसून येत आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी म्हटले की, आपने हिंदू देवी देवतांशी गैरवर्तन केले, पण आता ते निवडणुकीपूर्वी प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. राम मंदिराला विरोध करणारे नाव मुखवटा घेऊन आले आहेत. असेही ते म्हणाले. दरम्यान आता भाजपच्या आमदारानेच नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा अशी मागणी केल्याने यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


गिरगाव पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आगीची घटना; 2 घर, 7 कार, 10 दुचाकी जळून खाक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -