राज्यपाल कोश्यारींनी आपलं वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, छत्रपती उदयनराजे भोसले यांचा इशारा

खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असा इशारा उदयनराजे यांनी

Chhatrapati Udayan Raje Bhosale warned Governor Koshyari on his statement about shivaji maharaj
राज्यपाल कोश्यारींनी आपलं वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, छत्रपती उदयनराजे भोसले यांचा इशारा

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करावे असेही उदयनराजे म्हणाले आहेत. समर्थ रामदासांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल असे वक्तव्य राज्यपालांनी केले असून वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे शीवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला असून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तसेच राजकीय नेत्यांकडूनही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यातयेत आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत विधान करुन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच त्यांनी आपल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्यापालांना चांगलेच सुनावले आहे. राज्यपालांनी चुकिचा इतिहास सांगितले असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत राज्यपालांच्या वक्तव्यावर राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकिचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.

राज्यापाल नेमकं काय म्हणाले?

एका कार्यक्रमात संवाद साधत असताना राज्यापल म्हणाले की, चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? तसेच छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरूला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात” असं वक्तव्य राज्यपालांनी केले आहे.


हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांच्या भेटीचा पुरावाच नाही, सुप्रिया सुळेंनी राज्यपालांचा दावा काढला खोडून