Eco friendly bappa Competition
घर क्राइम छोटा पुढारी घनश्याम दराडेचा गौतमी पाटीलला इशारा; म्हणाला, 'महाराष्ट्राचा बिहार...'

छोटा पुढारी घनश्याम दराडेचा गौतमी पाटीलला इशारा; म्हणाला, ‘महाराष्ट्राचा बिहार…’

Subscribe

बार्शी शहर पोलीस ठाण्यात गौतमी पाटील विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दराडे याने गौतमीला इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटील विरुद्ध घनश्याम दराडे अशा चर्चांना उधाण आले आहे.

गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. राज्यातील सर्वांच्याच मनावर गौतमी पाटील अधिराज्य गाजवत आहे. एकीकडे डान्सवरून गौतमीचे कौतुक केले जाते तर, दुसरीकडे गौतमी विरोधात तक्रारही दाखल केल्या जात आहेत. नुकताच बार्शी शहर पोलीस ठाण्यात गौतमी पाटील विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दराडे याने गौतमीला इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटील विरुद्ध घनश्याम दराडे अशा चर्चांना उधाण आले आहे. (chhota pudhari ghanshyam darade warned to dancer gautami patil)

“महाराष्ट्राचा बिहार न करण्याचा’ सल्ला दिला आहे. तसे न केल्यास आम्हाला पण मुसंडी मारावी लागेल”, असा इशारा घनश्यामने दिला आहे. शिवाय, “सबसे कातिल गौतमी पाटील घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. आपला आणि गौतमीचा कोणताही वाद नसला तरी लावणी बदनाम होऊ नये म्हणून आपण इशारा दिला”, असेही घनश्याम दराडे याने सांगितले.

- Advertisement -

घनश्याम दराडे याचा नवीन चित्रपट ‘मुसंडी’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी घनश्याम विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने थेट गौतमी पाटील हीला इशारा दिला.

याशिवाय, गौतमीवर टीका करत असतानाच छोट्या पुढारीने विरोधीपक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले. “अजितदादा पवार लवकरच मोठ्या पदावर विराजमान होतील” असा विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisement -

गौतमी पाटील विरोधात बार्शीत गुन्हा दाखल

दरम्यान, गौतमी पाटील हिच्यावर सोलापूरच्या बार्शी येथे फसवणुकीच्या गुन्हा दाखल झाला आहे. यावरून करण्यात आलेल्या आरोपांचा गौतमी पाटील हिने खंडन केले आहे. आपण वेळेतच कार्यक्रमाला पोहोचलो होतो, पण जे काही आरोप करण्यात आले आहेत, तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्याची सखोल माहिती घेऊन यावर पुढील भाष्य करू, असे गौतमी पाटील हिने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अजून आपलं लग्न ठरलं नाही आणि लग्नाचा अजून कोणताही विचार नसल्याचे, देखील गौतमी पाटील हिने स्पष्ट केले आहे.

नेमके प्रकरण काय?

राजेंद्र गायकवाड यांनी 12 मे रोजी बार्शी येथे गौतम पाटील हिचा लावणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यावेळी 10 वाजून गेले होते. नियमानुसार, 10 नंतर स्पीकर बंद करणे बंधनकारक आहे. पण वेळेची मर्यादा न पाळल्याने पोलिसांनी गौतम पाटीलचा कार्यक्रम पोलिसांनी बंद पडला.

याप्रकरणी आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी कोणतीही शासकीय कार्यालयाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. लेखी कळवूनही गौतमी पाटील हिचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आला आहे.


हेही वाचा – इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; पाकिस्तानी लष्कराने दिले दोन पर्याय

- Advertisment -