घरक्राइमछोटा राजनचा फरार साथीदार संतोष सावंतला सिंगापूरमधून आणले भारतात

छोटा राजनचा फरार साथीदार संतोष सावंतला सिंगापूरमधून आणले भारतात

Subscribe

गेल्या दोन दशकांपासून फरार असलेला छोटा राजनचा साथीदार संतोष सावंत उर्फ अबू सावंत याला आज (ता. 19 एप्रिल) अखेरिस भारतात आणण्यात आले आहे. सचिन सावंत हा छोटा राजन याचा निकटवर्तीय मानला जातो.

गेल्या दोन दशकांपासून फरार असलेला छोटा राजनचा साथीदार संतोष सावंत उर्फ अबू सावंत याला आज (ता. 19 एप्रिल) अखेरिस भारतात आणण्यात आले आहे. सचिन सावंत हा छोटा राजन याचा निकटवर्तीय मानला जातो. तसेच तो अनेक वर्षांपासून छोटा राजनचे आर्थिक काम देखील पाहत होता, अशी माहिती समोर आली आहे. संतोष सावंत हा सिंगापूरमध्ये राहून हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली छोटा राजनसाठी काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सावंत हा गेल्या 22 वर्षांपासून कुख्यात गुंड छोचा राजनच्या टोळीसाठी काम करत होता. तर राजन टोळीतील डी. के. राव याच्यानंतर सावंतच छोटा राजनच्या सर्वात जवळील व्यक्ती होता, असे बोलले जाते. तसेच, 2000 या वर्षी जेव्हा छोटा राजन याच्यावर हल्ला झाला, त्यानंतर राजनचे जवळचे मित्र आणि त्याचे साथीदार असलेले रवी पुजारी, बंटी पांडे, हेमंत पुजारी, विजय शेट्टी त्याला सोडून गेले. पण संतोष सावंत याने मात्र छोटा राजनची साथ सोडली नाही आणि त्यामुळे तो राजनचा जवळचा साथीदार मानला जाऊ लागला.

- Advertisement -

छोटा राजनच्या काळ्या कमाईकडे लक्ष देणे, राजनच्या कंपनीचे प्रॉपर्टी डीलिंग करणे, राजनचे आर्थिक व्यवहार पाहणे यांसारखे काम संतोष सावंत याने स्वतःच्या ताब्यात घेतले होते. त्याच्या या कामामुळे त्याच्याविरोधात रेड कार्नर नोटीस देखील बजावण्यात आलेली होती.

दरम्यान, आता संतोष सावंत याला भारतात आणल्यानंतर त्याला सीबीआयकडून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे. तसेच, सीबीआयची चौकशी पुर्ण झाल्यानंतर सावंत याला क्राईम ब्रँच ताब्यात घेईल. सावंतवर गुन्हे मुंबई गुन्हे शाखेकडेही अनेक गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

संतोष सावंत म्हणजेच अबू सावंत याच्यावर एकूण सहा गुन्हे प्रलंबित असून त्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. अबू सावंत आणि छोटा राजनची पत्नी यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात हे दोघेही आरोपी आहेत. हे प्रकरण 2006 चे असून गुन्हे शाखेने छोटा राजनची पत्नी आणि दोन जणांना टिळक नगर येथील एका बिल्डरला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती.


हेही वाचा – दारू फुकट मिळाली म्हणून इतका प्यायला की जागेवरच…, घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -