Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशChief Justice Chandrachud : हा न्यायव्यवस्थेसाठी फार मोठा धोका; चंद्रचूड यांनी व्यक्त...

Chief Justice Chandrachud : हा न्यायव्यवस्थेसाठी फार मोठा धोका; चंद्रचूड यांनी व्यक्त केली भिती

Subscribe

समाजातील काही विशेष हित समूह हे दबाव आणून निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी त्यापासून सावध राहायला हवे, असे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहेत.

नवी दिल्ली : समाजातील काही विशेष हित समूह हे दबाव आणून निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी त्यापासून सावध राहायला हवे, असे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहेत. तसेच यामुळे न्यायव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. राज्य घटनेशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले आहे. (Former chief justice chandrachuds warning to be cautious some special interest.)

हेही वाचा : Congress : मोठी नामुष्की! मुख्यमंत्री, मंत्री, केंद्रीय मंत्री देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेसचा फक्त एक आमदार विजयी

- Advertisement -

सोशल मिडियाचा वापर करून काही विशेष हित समुहांकडून न्यायालयाच्या निकालांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी त्यापासून सावध राहिले पाहीजे असे त्यांनी सांगितले आहे. कोणत्याही निर्णयाचा आधार काय आहे, हे प्रत्येक नागरिकाला समजून घेण्याचा अधिकार आहे. तसेच निर्णयावर स्वत: चे मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार आहे. मात्र त्यापलीकडे विचार करून न्यायाधीशांना लक्ष्य केले जाते,तेव्हा खरचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का असा प्रश्न निर्माण होतो. तसेच कॅालेजियम पद्धतीबाबत गैरसमज आहेत, मात्र न्यायाधीशांच्या ज्येष्ठतेचा प्राधान्याने विचार केला पाहीजे असे ही माजी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले आहेत.

हेही वाचा : Ram Shinde : माझ्या पराभवाला कारणीभूत अजित पवार; राम शिंदेंचा थेट आरोप

- Advertisement -

आजच्या आधुनिक जगात लोक साेशल मीडियावर बघितलेल्या 20 सेकंदाच्या व्हिडीओच्या आधारे आपली मत तयार करतात. हा न्यायव्यवस्थेसाठी फार माेठा धाेका आहे. न्याधीशांना ट्राेल करुन निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची सांगितले आहे. त्यामुळे यापासून आता सावध राहायला हवे, असेही ते म्हणाले आहेत. तसेच न्यायाधीशांनी राजकारणात प्रवेश करायला हवा का? यावर चंद्रचूड म्हणाले, कायद्यानुसार यावर काेणतेही बंधन नाही. समाज तुम्हाला सेवानिवृत्तीनंतरही न्यायाधीशाच्या रुपात पाहत असतो. जे काम इतर नागरिकांसाठी ठीक आहे, ते न्यायाधीशांसाठी पदावरुन हटल्यानंतरही ठीक नाही. माझे काम आणि न्यायपालिकेच्या प्रामाणिकपणावर संशय निर्माण हाेईल, असे काेणतेही काम मी 65 वर्षांचा झाल्यानंतर करणार नाही, असे सांगत आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे संकेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहेत.


Edited By komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -