राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे महामानवाला अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दाखल झाले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दाखल झाले. राज्यपालांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह मंत्री, खासदार आणि आमदार यांनीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी दादरच्या चैत्यभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी दाखल झाले आहेत.

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी, भन्ते मोठ्या संख्येने दादर, शिवाजी पार्क परिसरात आले आहेत. कोरोना कालावधीतील वगळता मुंबई महापालिकेतर्फे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार, सालाबादप्रमाणे यंदाही चैत्यभूमी व दादर शिवाजी पार्क परिसरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायी यांच्यासाठी तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.


हेही वाचा – महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला जनसागर, दर्शनासाठी रीघ