घरमहाराष्ट्रआदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 100 ट्रूनॅट मशीन लोकार्पण

आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 100 ट्रूनॅट मशीन लोकार्पण

Subscribe

मुंबई : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे (TrueNat Machine) लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आरोग्य विभागाचे सचिव नविन सोना, आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

इंडियन ऑईलच्या माध्यमातून सीएसआर निधीतून हे १०० ट्रूनॅट मशिन आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याद्वारे क्षयरोग निदान लवकरात लवकर करण्यासाठी या मशिनचा उपयोग होणार आहे. राज्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या मोहिमेसाठी या मशिनमुळे मोठे बळ मिळाल्याचे सांगत राज्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, नागपूर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पालघर, अमरावती, गोंदिया, यवतमाळ, रायगड, पुणे, अहमदनगर, नांदेड या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात या मशिनचा वापर क्षयरोग निदानासाठी करण्यात येणार आहे. यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक अर्निबन घोष, महाव्यवस्थापक गौतम दत्ता आदी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -