घरमहाराष्ट्र'विरोधकांना विधानसभेतसुद्धा विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही'

‘विरोधकांना विधानसभेतसुद्धा विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही’

Subscribe

हिंगोलीतील महाजनादेस यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केला.

पंधरा वर्षे सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सत्तेची मुजोरी केली. त्यामुळे त्यांना जनतेने लोकसभा निवडणुकीत पराभूत केले आणि आता त्यांच्या यात्रांना जनता प्रतिसाद देत नाही. या पक्षाच्या नेत्यांच्या मुजोरीमुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही त्यांना विरोधी पक्षनेता बनवण्याइतक्या जागा मिळणार नाहीत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेदरम्यान हिंगोली जिल्ह्यात जवळाबाजार येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी हिंगोली जिल्हा पालकमंत्री अतुल सावे, यात्राप्रमुख भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार तानाजी मुटकुळे, भाजपा विभागीय संघटनमंत्री भाऊराव देशमुख आणि सुप्रीम कोर्टाचे वकील ॲड. शिवाजीराव जाधव उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री

सत्तेच्या पाच वर्षात राज्यातील दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, मराठा समाज, ओबीसी, धनगर समाज अशा सर्व घटकांसाठी भाजपा महायुती सरकारने काम केले. आपण केलेले काम जनतेला सांगायचे आणि जनतेचा आशिर्वाद घ्यायचा यासाठी महाजनादेश यात्रा काढली आहे. या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आमच्या यात्रेसाठी जमलेल्या लोकांना मैदाने पुरत नाहीत तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रांच्या सभांनी मंगल कार्यालये भरत नाहीत, अशी परिस्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचेच सरकार समस्या सोडवू शकते, असा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पंधरा वर्षे सत्ता दिली पण त्या काळात त्यांची मुजोरी इतकी वाढली की ते सामान्यांना विसरले आणि आपली संस्थाने उभी करून मोठे झाले. त्यामुळे जनतेने त्यांना पराभूत केले. विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी दहा टक्के खासदार किंवा आमदार असावे लागतात. लोकसभा निवडणुकीत विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याइतक्या जागा मिळाल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीतही त्यांची अशीच अवस्था होईल, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -