घरमहाराष्ट्र“…म्हणून अजित पवारांचे आभार मानतो”

“…म्हणून अजित पवारांचे आभार मानतो”

Subscribe

मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असे वाटत असताना सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी राज्यामध्ये स्थिर सरकार देण्यासाठी पुढाकार घेत भाजपाबरोबर येण्याचा निर्णय घेतला. इतरही काही नेते आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे,” असे फडणवीस यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.

- Advertisement -

 

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया

निकालापासून ते आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही पक्षाला राज्यामध्ये सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केले, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. महायुतीला कौल देऊनही शिवसेनेनं सोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -