घरमहाराष्ट्र४० आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला, तारीखही ठरली

४० आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला, तारीखही ठरली

Subscribe

गुवाहाटीचा हा दौरा एक दिवसाचा असणार असून त्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. तसंच, कामाख्या देवीच्या दर्शनासोबत ते गुवाहाटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस आयुक्त यांचीही भेट घेणार आहेत. या व्यक्तींनी सत्तांतराच्या काळात शिंदेसंह सर्व चाळीस आमदारांना संरक्षण आणि मदत दिली होती. 

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा एकदा जाणार आहेत. त्यांच्या या नियोजित गुवाहाटी दौऱ्यासाठी तयारी सुरू करण्यात आली असून तारीखही निश्चित करण्यात आली आहे. येत्या २१ नोव्हेंबर रोजी ते सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जातील, अशी माहिती समोर येतेय.

हेही वाचा – कांदे-भुसे वाद विकोपाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मध्यस्थी

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर सुरतमार्गे बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. तेथे बरेच दिवस राहिल्यानंतर ते कामाख्या देवीचं दर्शन घेऊन गोव्यामार्गे मुंबईत परतले. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यानंतर आपण पुन्हा गुवाहाटीला येऊन कामाख्या देवीचं दर्शन घेऊ असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानुसार, ते आता २१ नोव्हेंबरला गुवाहाटीला सर्व आमदारांना घेऊन जाणार आहेत.

हेही वाचा – माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा खुलासा

- Advertisement -

गुवाहाटीचा हा दौरा एक दिवसाचा असणार असून त्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. तसंच, कामाख्या देवीच्या दर्शनासोबत ते गुवाहाटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस आयुक्त यांचीही भेट घेणार आहेत. या व्यक्तींनी सत्तांतराच्या काळात शिंदेसंह सर्व चाळीस आमदारांना संरक्षण आणि मदत दिली होती.

हेही वाचा – चार डझन आमदार-खासदारांवर सीबीआयचे खटले प्रलंबित, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कामाख्या देवी हे जागृत देवस्थान मानलं जातं. कामाख्या देवीची पूजा केल्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी धारणा भक्तांची आहे. त्यामुळे अनेकजण इथे दर्शनासाठी येत असतात. कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. एवढंच नव्हे तर त्यांना अनपेक्षितरित्या मुख्यमंत्री पद मिळालं. त्यामुळे ते पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचं बोललं जातंय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -