घरताज्या घडामोडीकाश्मीरमधील गणेशोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी; म्हणाले, '...ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब'

काश्मीरमधील गणेशोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी; म्हणाले, ‘…ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब’

Subscribe

मुंबईसह देशभरात गणेशोत्सवात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. घराघरांत गणपती बाप्पाचे आगमन झाले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पा विराजमान झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाप्रमाणे काश्मीरमधील गणेशोत्सवाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

मुंबईसह देशभरात गणेशोत्सवात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. घराघरांत गणपती बाप्पाचे आगमन झाले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पा विराजमान झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाप्रमाणे काश्मीरमधील गणेशोत्सवाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्‍मीरमधील संवेदनशील भाग मानल्या जाणाऱ्या लाल चौक येथील पंचमुखी हनुमान मंदिरातील गणपती बाप्पाचे नुकतेच दर्शन घेतले. (Chief Minister Eknath Shinde attends Ganeshotsav in Kashmir)

काश्‍मीरमधील संवेदनशील भाग मानल्या जाणाऱ्या लाल चौक येथील पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या २४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. काश्मीरमधील लाल चौकातल्या गणेशोत्सवाने यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मंदिरातल्‍या या उत्सवाला सार्वजनिक रूप प्राप्त झाल्याचं बघायला मिळत आहे. या मंदिरात बसविलेल्या गणपतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दर्शन घेतले. तसेच येथील नागरिकांनी जपलेल्या परंपरेचे कौतुक करत संवेदनशील परिस्थितीत गणेशोत्सवानिमित्त अधोरेखित होणाऱ्या काश्मीरच्या सामाजिक व धार्मिक एकोप्याने ते भारावून गेले.

- Advertisement -

पुण्यातील ‘सरहद’ संस्थेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, वैभव वाघ, सचिन जामगे आदी उपस्थित होते.

दरम्यान, “काश्मीरच्या लाल चौकात गणेशोत्सव साजरा होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. काश्मीरमध्ये १०० हून अधिक मराठी कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील गणेशोत्सवात मराठी कुटुंबीयांसोबतच काश्मिरी मुस्लीम, काश्मिरी पंडित, शीख, बंगाली हेही तितक्याच उत्साहानं सहभागी होतात. हा एकोपा, सलोखा आणि शांती काश्मीरसह संपूर्ण भारतात अखंड टिकून राहावी”, असे काश्मीरमधील गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – EXPLAINER : मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्रतेवर सोमवारी सुनावणी; शिंदेंनंतर भाजपसमोर पर्याय काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -