आपण कृतीतून त्यांना उत्तर देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका

आपण कृतीतून त्यांना उत्तर देऊ, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. ते हिंगोली येथे सभेत बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांची आज हिंगोली येथे सभा झाली. यासेभेत आपल्या स्वागताला होणारी गर्दी हेच समोरच्यांना उत्तर आहे. आपल्यावर टीका होतेय पण आपण कृतीतून उत्तर देऊ, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

यावेळी आपल्या स्वागताला होणारी गर्दी हेच समोरच्यांना उत्तर आहे. आपल्यावर टीका होत आहे. पण आपण कृतीतून त्यांना उत्तर देऊ. अशी टीका विरोधकांवर केली. दरम्यान बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही पुढे नेतोय ही चूक आमची की कुणाची?, असा टोला नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.

केंद्राचे आपल्याला पाठबळ –

केंद्र सरकारचे आपल्याला पाठबळ आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मला राज्याला विकासाकडे घेऊन जा. केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मोठी मदत करणार –

मी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करताना तिथल्या विविध विभागांची बैठक घेतो तिथेच प्रश्न सोडवतो. मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीचे नुकसान पाहीले आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की जेवढी मदत आतापर्यंत झाली नाही तेवढी मदत आम्ही देऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आमदारांचे कौतुक –

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचे कौतुक केले. संतोष बांगर यांनी योग्य निर्णय घेतला. तुमच्या रुपाने त्यांची लोक प्रियता समोर आली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.