Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापटांच्या निमित्ताने दिलदार नेतृत्व गमावले - मुख्यमंत्री एकनाथ...

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापटांच्या निमित्ताने दिलदार नेतृत्व गमावले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलीच नाही तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी सांगितले की, बापच यांनी राजकीय कारकीर्द नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती, असे शिंदे म्हणाले.

- Advertisement -

बापट यांची सर्व पक्षांमध्ये मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेल्याचे दु:ख होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास
आणीबाणीच्या काळात तुरंगात शिक्षा भोगून आल्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याच काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली आणि पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळी निवडून आले. 1996 साली त्यांना भाजपने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काॅंग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळाले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काॅंग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

- Advertisement -

 

- Advertisment -