घरताज्या घडामोडीपोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी सर्वपक्षीयांना फोनवरून विनंती केली - मुख्यमंत्री शिंदे

पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी सर्वपक्षीयांना फोनवरून विनंती केली – मुख्यमंत्री शिंदे

Subscribe

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान सभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान सभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच, महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची त्यांनी मागणी केली आहे. (Chief Minister Eknath Shinde initiative to make Kasba Chinchwad by-election unopposed In Pune)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याणमधील मलंग गडावरील उत्सवाला हजेरी लावली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीयांना फोनवरून विनंती केल्याचे सांगितले. “शनिवारी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विनंती केली की, आपल्या या महाराष्ट्राची एक संस्कृती व परंपरा आहे. ज्या ठिकाणी आमदार सदस्यांचे दु:खद निधन होते. त्या पोटनिवडणुकीत आपण उमेदवार उभे करत नाहीत. ती निवडणूक बिनविरोध होते. अशाप्रकारे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीवेळी राज ठाकरे आणि शरद पवार यांनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने दिला होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाली. विशेष म्हणजे या सगळ्यातून महाराष्ट्रातील जनतेला एक चांगला संदेश देता येऊ शकतो. परंतु, विनंती करण्याचा काम आमचे असून, निर्णय घेण्याचे काम त्यांचे आहे”, असेही शिंदेंनी सांगितले.

दरम्यान, “मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे. एक वेगळा आनंद, वेगळा अनुभव आणि समाधान तसेच, कार्यकर्त्यांमधील प्रचंड असा उत्साह पाहायला मिळत आहे. सगळी कामं बाजूला ठेवून दिवंगत नेते आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला होता. दरवर्षी मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते सहभागी होत असतात. मलंग गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेत असतात”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन, दुबईत घेतला अखेरचा श्वास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -