घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरईडीच्या भीतीने कोणी आमच्याकडे येऊ नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ईडीच्या भीतीने कोणी आमच्याकडे येऊ नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी मराठवाड्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर होणाऱ्या ईडीबाबतच्या आरोपाला उत्तर दिले. कोणी ईडीच्या भीतीने आमच्यात किंवा भाजपमध्ये येत असेल तर त्यांनी येऊ नये. कोणावर दबाव टाकून त्यांना आमच्यात घ्यायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ई़डी कारवाई सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे भाष्य केले.

कर नाही, त्याला डर कशाला –

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, चौकशी सुरू आहे ना, अटक होणार की नाही हे मला माहित नाही, मी काय तिकडचा अधिकारी नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या. ते तर म्हणालेत ना की मी काही केलेलं नाही. ते म्हणत होते,मी चौकशीला सामोरे जाणार. कर नाही, त्याला डर कशाला. काय व्हायचे ते होऊद्या. ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ईडीच्या भीतीने आमच्याकडे येऊ नका –

- Advertisement -

यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर होणाऱ्या ईडीबाबतच्या आरोपावर मी आज जाहीरपणे सांगतो की ईडीच्या भीतीने जर कोणी येत असाल तर कृपया आमच्याकडे येऊ नका. भाजपामध्येही नाही, आणि शिवसेनेतही नाही. हे मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतोय. अर्जुन खोतकर असो नाहीतर आणखी कोणी असो, ईडीच्या कारवाईला घाबरुन, दडपणाखाली कोणीही पुण्याचे काम करू नका, असे उत्तर दिले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -