घरमहाराष्ट्रनाशिककांदे-भुसे वाद विकोपाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मध्यस्थी

कांदे-भुसे वाद विकोपाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मध्यस्थी

Subscribe

नाशिक – शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यातील वादावर तोडगा काढायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, यावेळी सुहास कांदे नांदगावला गेल्याने ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सुहास कांदे यांनी दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली होती. तसंच, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातही हजर नव्हते. त्यामुळे शिंदे गटात ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे आज पुन्हा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात कांदे, भुसे आणि गोडसे यांच्यातीस वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, सुहास कांदे कामानिमित्त नांदगावला गेले आहेत. एकनाथ शिंदे दौऱ्यावर येणार असल्याचं माहित असतानाही ते सुहास कांदे नांदगावला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -