घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार; मग गुळाचा गणपती कोण? 'सामना'तून सवाल

मुख्यमंत्री लवकरच विसर्जित होणार; मग गुळाचा गणपती कोण? ‘सामना’तून सवाल

Subscribe

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच विसर्जित होणार, सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाचा दावा करण्यात आला आहे. आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात ते पाहायचं आहे, असं सामानाच्या अग्रलेखातून म्हणण्यात आलं आहे.

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच विसर्जित होणार, सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाचा दावा करण्यात आला आहे. आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवतात ते पाहायचं आहे, असं सामानाच्या अग्रलेखातून म्हणण्यात आलं आहे. तसंच, राज्याच्या राजकारणात इतका गोंधळ आणि अराजक कधीच माजलं नव्हतं, असं म्हणत सामनातून राज्य सरकारवर तसचं, बीजेपीवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. ( Chief Minister Eknath Shinde will soon dissolve Question from Samana Editorial )

मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सरकार बदलाच्या बाता करत आहेत. तसेच, राजकीय वर्तुळातूनही तसेच सूर ऐकू येत आहेत. आता आजच्या, 25 एप्रिलच्या सामनाच्या अग्रलेखातूनही यावर भाष्य करण्यात आलं आहे.

- Advertisement -

भर मंडपात वरमाला, अक्षता तयार असताना अचानक बोहल्यावर मिध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडवलं गेलं. त्या धक्क्यातून ते अद्यापी सावरलेले नाहीत. त्यात आता मुख्यमंत्रीपदासाठी कधी राधाकृष्ण विखे पाटील तर कधी राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अजित पवार यांचं नाव चर्चेत आहे, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हणत भविष्यातील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतील चर्चेत असणारी दोन नावं देण्यात आली आहेत.

राजकारणात भलताच खेळखंडोबा सुरु

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भलताच खेळखंडोबा सुरु आहे. राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही, पण राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत की नाही? असा प्रश्न पडला आहे. पण मुख्यमंत्रीपदावर रोज चर्चा झडत आहेत. मुख्यमंत्रीपद रिकामे नाही हेखरे, पण रिकामेपणाचे उद्योग जोर धरु लागले आहेत. एका कार्यक्रमात अजित पवार यांनी प्रश्न मुख्यमंत्रीपदाविषयी विचारला आणि ते म्हणाले की 2024 पर्यंत का थांबायचे आताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

- Advertisement -

सरकार पुरस्कृत हत्येवर फडणवीस गप्प

खारघरमध्ये झालेल्या सभेत 16 जणांचा भुकेने तडफडून मृत्यू झाला, लोक चेंगरुन मेले, या सरकार पुरस्कृत हत्येवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. सत्तेची ही नशा त्यांनी चढली आहे का? आफ्रिकेतून आणलेला चित्ता मेला म्हणून सर्वांना दु:ख झालं परंतु 16 श्रीसेवकांचा मृत्यू झाला त्यावर बोलायला कोणी तयार नाही.

( हेही वाचा: निराशा उद्धव ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडत आहे; मोदींवरील टीकेला फडणवीसांचे उत्तर )

रिफायनरी- फडणवीसांचे पोलीस बंदुका रोखून उभे

फडणवीसांचे पोलीस बंदुका रोखून उभे आहेत. रिफायनरीविरोधातील आंदोलन चिरडायचे, मग त्यात आंदोलकांचे बळी गेले तरी चालतील असे अमानुष धोरण मिंधे-फडणवीस सरकारचे आहे. सत्तेची नवटाक दारु चढल्यानेच हे निर्घृण कृत्य सुरु आहे. पैशांच्या व सत्तेच्या नशेत राज्य सरकार चूर असून महाराष्ट्र राज्य त्या नशेत झोकांड्या आखत आहे, असा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -