रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

maharashtra Chief Minister Eknath shinde today Delhi visit meet pm modi and amit shah

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील खरीप हंगाम, पाऊस-पाणी आणि पीकविमा याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार, असा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

जे प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत. त्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार, असा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच जी काही कामं रखडलेली आहेत. ती सर्व कामं वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही कॅबिनेटच्या बैठकीत घेतला आहे.

जे रखडलेले प्रकल्प आहेत. त्या रखडलेल्या प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास हेच आमचं ध्येय आहे. पीकपाणी या सर्व गोष्टींचा आम्ही आढावा घेतला आहे. माजी मुख्यमंत्रीसोबत असल्यामुळे आता जोरदार बॅटींग होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यामधील जनतेचं अपेक्षित काम पूर्ण करायचं आहे. काही प्रकल्पांची सुरूवात ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाली. काही कामं ही प्रगतीपथावर आहेत. तर काही कामं ही अंतिम टप्प्यावर आहेत. तसेच ही कामं पूर्णत्वास गेली पाहीजेत. ही सर्व कामं पूर्ण करण्यासाठी पहिल्याचं दिवशी आम्ही या कामांना हात घातलेला आहे. राज्यातील सर्व महत्त्वाचे घटक कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि सगळ्याच क्षेत्राला न्याय देण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फडणवीसांचं