घरताज्या घडामोडीआमची भूमिका लोकमान्य झाली.., ग्रामपंचायत निवडणुकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आमची भूमिका लोकमान्य झाली.., ग्रामपंचायत निवडणुकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Subscribe

मी सर्वात प्रथम मतदारांचे आभार मानतो. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांनी मतदान केल्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेला ५०० पेक्षा जास्त जागा सरपंचपदी मिंळाल्या आहेत. त्याबद्दल मी मतदारांचे आभार मानतो. आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. निवडणुकीत यश-अपयश येत असतं. परंतु मतदारांनी कौल दिला आहे. मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील कौल दिला होता. या ग्रामपंचायतीत चित्र स्पष्ट झालं आहे. यावेळी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची जी भूमिका घेतली आहे. ही भूमिका निवडणुकीत सर्वमान्य आणि लोकमान्य झाली आहे. त्यामुळे मतदारांनी आमच्या पारड्यात भरघोस मतदान केलं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली. राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आहे. सरकारच्या माध्यमातून या ग्रामपंचायती ग्रामीण भागामध्ये विकास होईल. लोकांचे प्रकल्प मार्गी लागतील. त्यांना न्याय मिळेल. असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत व्यक्त केला आहे.

- Advertisement -

भाजपची निवडणुकीतून माघार

रमेश लटके हे आमचे सहकारी आमदार होते. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत राज ठाकरे, शरद पवार आणि प्रताप सरनाईक यांनी सर्वांनी आवाहन केलं. महाराष्ट्राची प्रथा, परंपरा पाहत आलो आहे. यामध्ये ज्या जागेवर आमदाराचा मृत्यू होतो. तसेच त्याठिकाणी त्यांच्या घरातलं कुणी उभं राहिलं तर ती निवडणूक बिनविरोध होते. भाजप-शिवसेनेने उमेदवार दिला होता. तसेच त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती. त्यांना जिंकण्याचा विश्वास देखील होता. परंतु सर्वांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माझी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांच्या वरिष्ठांसोबत देखील चर्चा झाली. प्रथा-परंपरा कायम राखण्याचं काम भाजपाने केलं आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेऊन ही निवडणूक बिनविरोध केली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : पुणेकरांना, बेधडक तोडा वाहतुकीचे नियम! चंद्रकांत पाटलांकडून 10 दिवसांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -