घरमहाराष्ट्रसुधागडात ग्रामसडक योजनेचा बोजवारा

सुधागडात ग्रामसडक योजनेचा बोजवारा

Subscribe

निधी गेला कुणाच्या खिशात ?

सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. असे असताना खुरावले फाटा ते कवेळे रस्ता सुधार योजनेचा मात्र बोजवारा उडाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होऊन बसले आहे.

खुरावले फाटा ते कवेळे या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 2 कोटी 78 लाख इतका निधी उपलब्ध झाला आहे. परंतु हा निधी खरोखरच पूर्णपणे वापरला गेलाय की कुणाच्या खिशात गेला, असा सवाल रस्त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर लक्षात येते. चार किलोमीटर इतक्या अंतराचा हा रस्ता असून, 7 मीटर रूंदीकरणाचा तो असला तरी तितक्या रूंदीचा दिसून येत नाही. 7 मीटर रूंदीमध्ये रस्त्यालगत असणारे वीजवाहक तारांचे खांबसुद्धा रस्त्यात येत आहेत. त्याचे या ठिकाणी कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरण्यात आलेले पाईप हेसुद्धा 7 मीटर लांबीचे वापरण्यात आले नाहीत. रस्त्याच्या मोर्‍या अर्धवट असल्याने वाहतुकीस अडचण होत आहे. रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

या रस्त्याचे काम सुरू होऊन तीन ते चार महिने उलटून गेले आहेत. प्रवाशांच्या दृष्टीने मात्र हा रस्ता केवळ अपघाताचा केंद्र बिंदू बनला आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. जागोजागी मातीचा भराव करण्यात आला आहे. वाहनचालकांना त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसात या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. याचा त्रास शाळकरी विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे योग्यरित्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नसल्याने शेतकर्‍यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रूंदीकरणाच्यावेळी संबंधित ठेकेदार (सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शन), तसेच बांधकाम अभियंता उपस्थित राहून लक्ष देत नसल्याने या रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

स्थानिक आमदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खुरावले फाटा ते कवेळे रस्त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु या रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल होत आहेत. सात दिवसाच्या आत ठेकेदार बदलला गेला नाही, तसेच रस्ता वाहतुकीस योग्य झाला नाही तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण करणार आहे.
-उत्तम देशमुख, उपसरपंच, वाघोशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -