Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "मी पत्रकार परिषदेत येईल याची मुख्यमंत्र्यांना धाकधूक", संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

“मी पत्रकार परिषदेत येईल याची मुख्यमंत्र्यांना धाकधूक”, संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Subscribe

मुंबई : “मी पत्रकार परिषदेत येईल याची मुख्यमंत्र्यांना धाकधूक होती”, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागवला आहे. राज्य सरकारची आज मराठवाड्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडील. राज्य सरकारने मराठवाड्यासाठी 59 हजार कोटी रुपयाचे पॅकेज घोषणा केली. या पत्रकार परिषदेत मुख्यमत्र्यांनी राऊत आले नाही का?, असा सवाल केला होता. मुख्यमंत्र्यांच्या प्रश्ना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत राऊत आले का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या मनात थोडी तरी धाकधूक तर असणारच की येणार तर नाही ना. शेवटी भूताटकी आहे ना. येवून कोणाच्या मानेवर बसणार नाहीत ना. आता झाले, त्यांची बैठक संपली. मुख्यमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडला. नेहमी प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आरोप केले. संभाजीनगर आणि मराठवाड्याला काय मिळाले तर घोषणाच मिळाल्या.”

- Advertisement -

हेही वाचा – राऊत’ आले नाहीत का? मुख्यमंत्र्यांचा खोचक प्रश्न

माझ्याबद्दल राज्य सरकारच्या मनात भीती

मंत्रिमंडळाच्या बैठकीचा पास तुमच्याकडे आहे का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “संजय राऊत पत्रकार, खासदार आणि संपादक मी कुठे ही जाऊ शकतो. मला कुठल्याही पासची गरज नाही. मी मुक्त आहे. मी मंत्रिमंडळाच्या पत्रकार परिषदेला येतोय. म्हटल्यावर राज्य सरकारने पत्रकार परिषदेवर बंधने आणली. मी असे ऐकले की, मी फोटो असलेले पास दिले, असे यापूर्वी कधी महाराष्ट्रात झाले नाही. मी पत्रकार परिषदेला येणार असे म्हटल्यावर फोटो असलेले पास दिल्याचे मला कळाले आहे. ऐवढी भीती मनात बाळगू नये.”

- Advertisement -

हेही वाचा – “घोषणा कागदावर उतरवून काम करतो”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

पोलिसांनी माझ्यावर पाळत ठेवली

पोलिसांचे तुमच्यावर पाळत होती का?, यावर संजय राऊत म्हणाले, “मी सामनात बसलो होतो. साध्या वेशातील पोलीस बाहेर बसले होते. मला सारखे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोन येत होते. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना देखील फोन येत होते. जाऊ द्या आता संपला विषय”

- Advertisment -