आम्ही केलेलं बंड नव्हे, तर अन्यायाविरोधात उठाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde

मुंबईत ठाण्यात एन्ट्री केल्यानंतर भर पावसात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते भिजत राहिले. महिला शक्ती ज्याच्या मागे आहे. त्यामुळे भयावह व्हायची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाची भूमिका, विकास आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण या दोन कारणांमुळे आम्ही बंड नाही तर अन्यायविरोधात उठाव केला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही केलेलं बंड नव्हे, तर अन्यायाविरोधात उठाव

अन्याय जेव्हा जेव्हा होईल. अन्याय सहन करू नका. अन्यायाच्या विरूद्ध पेटून उठा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, या ठिकाणी मागील १५ दिवस आम्ही ठाण्याच्या बाहेर होतो. आज आम्ही ठाण्यात आलोय. तुम्हाला जसं मला भेटायचं होतो, तसं तुम्हाला देखील माझ्या शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना भेटायची ओढ लागली होती. आज मुंबईमध्ये विधानभवनात सरकारवर विश्वासदर्शक ठराव बहुमताने पारीत झाला. एकीकडे ९९ होते तर दुसरीकडे १६४ होते, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचे काम करणार

तब्बल १५ दिवसांनी ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंद नगर चेक नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर आपल्या ५० समर्थक आमदारांसह ते थेट आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर दाखल झाले. स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिवादन केले.त्यानंतर आनंद आश्रय येथे भेट देत, कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केले. यावेळी बोलताना, हे सरकार हिंदुत्वाचा विचार पुढे नेऊन सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

मोठ्या राजकीय घडामोडीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच ठाण्यात आले. एकनाथ शिंदे हे दुपारी ४ पर्यंत ठाण्यात येतील यासाठी २ वाजल्यापासून एकनाथ शिंदे समर्थकांनी आनंद नगर चेक नाका आणि आनंद आश्रमात गर्दी केली होती. शहरात ठिकाणी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. संध्याकाळी ९.३० च्या सुमारास ५० आमदारांसह शक्ती स्थळावर दाखल झाले. एक मोठी बस आणि एकनाथ शिंदे यांचा ताफा शक्तीस्थळावर दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आला. यावेळी जोरदार घोसनबाजी करत त्यांचे स्वगत करण्यात आले, यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. एकनाथ लोकनाथ या गाण्याचा गजर यावेळी करण्यात आला. जय भवानी जय शिवाजी, एकनाथ शिंदे आगे बढो अशा घोषणा दिल्या.


हेही वाचा : ४० आमदारांचा मुख्यमंत्री यात काळेबेरे, अजित पवारांना संशय