घरमहाराष्ट्रअडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री ही अट मान्य नसेल तर युती तोडा - रामदास...

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री ही अट मान्य नसेल तर युती तोडा – रामदास कदम

Subscribe

युतीचे मनोमिलन झाल्यानंतर आता त्यातील आतल्या बातम्या बाहेर यायला लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री यांनी मुख्यमंत्री अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा युती तोडू असा इशारा दिला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामध्ये युतीची घोषणा झालेली असली तरी मात्र या दोन्ही पक्षाचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाचे नाट्य काही संपताना दिसत नाही. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री ही जर अट मान्य नसेल तर युती तोडा, असा इशारा पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपाला दिला आहे. विधानसभेत युतीमध्ये ज्याचा एक आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री वाटप असा कोणताही फॉर्म्युला नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर आज शिवसेनेकडून त्याला जशास तसे उत्तर आले आहे.

म्हणून दोन्ही पक्षाचा अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री

ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री ही अट ठेवली तर आमदार पाडापाडीचे धंदे सुरू होतात म्हणून आम्ही अडीज अडीज वर्ष मुख्यमंत्री अशी अट उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. मुख्यमंत्री, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकटे चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपा नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. एवढंच नाही तर युती ही नाणार रद्द करण्यासाठी केली. त्यामुळे नाणार रद्द होईल ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. घोषणा झाली असली तरी कागद पूर्तता आचार संहिते पूर्वी होतील असा विश्वास देखील रामदास कदम यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

निवडुन आलेल्या आमदारांच्या संख्येवरून सत्ता स्थापन करतांना मंत्रिपद वाटपाचे सूत्र असेल असे सांगत लोकसभेसाठी शिवसेनेला एक जादा जागा सोडली आहे, कोणती जागा हे अजून ठरायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच
रावसाहेब दानवे यांना अर्जुन खोतकर विरोध करत आहेत यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. दानवे नेहमी निवडणूक जिंकतात, ते आताही जिंकतील असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -