Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्राधान्य देण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

पुरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्राधान्य देण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

Subscribe

गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली दौऱ्यावर पुरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या

गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पुढील 2 दिवस गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. ते नागपूरला पोहोचले यावेळी पुरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये. यासाठी जे लागेल ते शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. काहीही कमी पडणार नाही. याबाबत सूचना आम्ही देणार आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले – 

- Advertisement -

एसडीआरएफ आणि स्थानिक समितीने आपली यंत्रणा तयर ठेवली आहे. कुठल्याही परस्थितीमध्ये आम्ही जिवित आणि मालमत्तेची हानी होऊनये यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर परस्थितीच्या भागातील नागरींकांचे सुरक्षीत स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्यावस्था आणि नियोजनात शासन कमी पडनार नाही. याबाबत सूचना दिल्या आहेत. राज्याच्या इतर भागातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी मी स्व:ता आणि उमुख्यमंत्री संपर्क ठेऊन आहेत. कुठल्याही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जीवितहानी होऊनये म्हणून एनडीआरएफ, एअर फोर्स सह सर्व यंत्रणांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्टवर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

काय आहे स्थिती –

- Advertisement -

गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुढील 2 दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. पुढील 3 दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. गडचिरोलीच्या भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे.

NDRF टीम अलर्ट मोडवर –

जोरदार पावसामुळे NDRF टीम आणि SDRF च्या टीमला सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात भागात जोरदार पाऊस आहे. गडचिरोलीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -