मनोहर जोशी, लीलाधर डाकेंकडून मुख्यमंत्र्यांनी निष्ठा शिकून घ्यावी, शिंदेंना राऊतांचा सल्ला

या भेटीवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडून कडवट शिवसैनिकांची निष्ठा शिकून घ्यावी असं संजय राऊत म्हणाले.

sanjay raut

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिवसनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काल त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि माजी मंत्री लीलाधर डाके यांची भेट घेतली. या भेटीवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडून कडवट शिवसैनिकांची निष्ठा शिकून घ्यावी असं संजय राऊत म्हणाले. (Chief Minister should learn loyalty from Manohar Joshi, Leeladhar Daken, Raut’s advice to Shinde)

एकनाथ शिंदे लीलाधर डाके आणि मनोहर जोशींना भेटले. डाके आणि जोशी सर हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत कडवट शिवसैनिक म्हणून ठामपणे त्यांच्या पाठिशी राहिले आहेत. मला खात्री आहे की या गोष्टी शिकण्यासाठी अशा कडवट शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्टी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यावरून संजय राऊत म्हणाले की, ते कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत. हे मला माहीत नाही. शिवसनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा त्यांना अधिकार काय? हा सगळा पोरखेळ चालला आहे, असंही पुढे संजय राऊत म्हणाले.

कोणाला मुख्यमंत्री बनायचं असतं मिळेल त्या मार्गाने. आम्हालाही महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे, पण मिळेल त्या मार्गाने नाही. राज्यात महापूर आहे. लोकं वाहून गेलेत. नुकसान झालंय. गुरं-ढोरं वाहून गेले. दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या पण मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री फिरणार असलतील तर त्यावर टीका करण्यासारखं काही नाही, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न

ईडीचे समन्स येत आहेत. येऊद्या. आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत. राजकीय दबावासाठी सर्व काही सुरू आहे. माझा आवाज दाबण्यासाठी सर्व सुरू आहे. संजय राऊत कोण आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांना माहीत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.