घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर; जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर; जीवे मारण्याची धमकी

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर आता त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राहुळ गेठे देखील नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. डॉ. गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनी लाल शाईने लिहिलेले धमकीचं पत्र डॉ. गेठे यांना घरी मिळालं आहे. या पत्रात नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून डॉ. राहुल गेठे विशेष कार्यकारी अधिकारी OSD म्हणून पदभार सांभाळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मविआ सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यावेळी गडचिरोलीतील नक्षलवादी भागात त्यांनी अनेक विकासकामं केली होती. या विकासकामांची अंमलबजावणी करत ती जलदगतीने पूर्ण करण्याची जबाबदारी विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गेठे यांच्यावर होती. यावेळी देखील नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेठे यांच्या कामात अडथळा आणत विकास कामे न सुरु करण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

- Advertisement -

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र होती घेतल्यापासून गडचिरोली जिल्ह्यात विकास कामांना वेगाने करण्याचे आदेश दिले, त्यानुसार डॉ. राहुल गेठे यांनी कामांचा धडाका सुरु केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डॉ. राहुल गेठे नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आले आहेत. तसेच त्यांना नक्षलवाद्यांनी धमकीचे पत्र पाठवलं आहे.

डॉ. राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पत्रात नेमकं काय लिहिले?

जय लाल सलाम, जय किसान

- Advertisement -

डॉ. राहुल गेठे यांना शेवटची धमकी

एकनाथ शिंदे यांचे अधिकारी डॉ.राहुल गेठे यांच्यामुळे आमचे खूप नुकसान होत आहे. आम्ही लवकरच आमच्या मृत भावांचा बदला घेणार आहोत. लाल शाईने लिहिलेल्या पत्रातून गेठे यांना जीवे
मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

जय नक्षलवाद
भामरागड / एटापल्ली
CPI – कमिटी

गेल्या काही महिन्यात त्यांनी गडचिरोली येथे विकास कामांचा धडाका लावला, त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले, त्यामुळे गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यातील नक्षलवादी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. याच नाराजीतून त्यांना एक पत्र देण्यात मिळाले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.


एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा केला होता पर्दाफाश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -