घरदेश-विदेशChief Minister : देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या टॉप 10 मध्ये कुणाला स्थान?

Chief Minister : देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या टॉप 10 मध्ये कुणाला स्थान?

Subscribe

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदेंना फक्त 1.9 टक्के लोकांची मते मिळाली आहे. यात यादीत मुख्यमंत्री शिंदेंचे स्थान हे शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर इंडिया टुडेने ‘मूड ऑफ दे नेशन’ या सर्व्हे करून देशातील जनतेचे जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात मोदी हे पंतप्रधान पदी विराजमान होण्याची हॅटट्रिक साधणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यात इंडिया टुडेने ‘मूड ऑफ दे नेशन’ अंतर्गत देशातील 28 राज्यांपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री लोकांच्या सर्वाधिक पसंती आहे, असाही सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव 10 मध्ये नाहीत तर, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. नवीन पटनायक यांना 52.7 टक्के जनतेचे पसंती आहेत.

या सर्व्हेत दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती मिळाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांना तिसऱ्या क्रमांक मिळाला असून त्यांना 48.6 टक्के मते मिळाली आहेत. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना 42.6 टक्क्यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांचे नाव यादीत आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेनाव टॉप 10 मध्ये देखील नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Prime Minister : मोदींशिवाय पंतप्रधान पदासाठी ‘या’ नेत्यांना आहे पसंती

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदेंना फक्त 1.9 टक्के लोकांची मते मिळाली आहे. यात यादीत मुख्यमंत्री शिंदेंचे स्थान हे शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे लोकांना नापसंद असल्याचे स्पष्ट चित्र या सर्व्हेतून दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bihar Floor Test: …तर बिहारमध्ये होऊ शकते मोठी खेळी; नितीश कुमारांचे फासे उलटे पडणार?

मोदींशिवाय पंतप्रधानांच्या पसंतीत ‘या’ नेत्यांचा नाव आहे चर्चेत

इंडिया टुडेने ‘मूड ऑफ दे नेशन’ या सर्व्हेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान मोदींनंतर सर्वाधिक पंसती मिळाली आहे. अमित शहा यांना 29 टक्के लोकांनी पसंती दिली. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिसऱ्या क्रमांक मिळाला आहे. या सर्व्हेत योगी आदित्यनाथ यांना 25 टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना 16 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी पसंती दिली आहे. 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीदरम्यान इंडिया टुडेच्या ‘मूड ऑफ द नेशन’ने हा सर्व्हे पूर्ण झाला असून त्यांनी केलेल्या सर्व्हेतील अंदाज हा बरोबर असेलच असे नाही, असेही त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -