घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांना दहा वाण मोफत देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

शेतकऱ्यांना दहा वाण मोफत देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Subscribe

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य सरकारने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत ठाकरे यांनी यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

ज्या राज्यात शेतकरी सुखी ते राज्य सुखी. शेतकरी बांधव कष्ट करत असताना स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण राज्य सरकार आता शेतकरी बांधवांना मोफत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली.

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य सरकारने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत ठाकरे यांनी यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२२ ’ पार पडली.  या बैठकीत बोलताना ठाकरे यांनी यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे, कृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहे, मुळे आपणा सर्वांच्या प्रयत्नाने आणि सहकार्याने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी बांधव आपल्या कुटुंबातले घटक आहेत. त्यामुळे यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले पाहिजे. रोग, किडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे. पण हमखास भाव मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकरी बांधवांसमोर पीक विम्याचा प्रश्न आहे. पीक विमा समाधानकारक नाही. केंद्राकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे,असेही ठाकरे यांनी सांगितले. तर राज्यातील शेतकरी बांधवांना खते, बियाणे वेळेत मिळाली पाहिजेत. खते कमी दरात वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने केंद्र सरकारच्या संपर्कात रहावे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावे. कृषी विभाग योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो,  बाब समाधानाची आहे. या विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करू देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी  स्पष्ट केले. या बैठकीला  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धन आणि  दुग्धविकास मंत्री सुनील केदार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापाठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

 अन्नधान्य उत्पादनात ९ टक्के वाढ
राज्यात गेल्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने अन्नधान्य उत्पादनात सरासरीच्या ३९ टक्के वाढ झाली आहे. अन्नधान्य पिकाचे एकूण १६५.०२ लाख मेट्रिक टन एवढे उत्पादन झाले आहे. यंदाही सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने कृषी विकास दर सुधारण्याचा अंदाज आहे.  खरीप हंगाम पूर्व बैठकीत मागील वर्षी झालेल्या कृषी उत्पादनाचा अंदाज घेण्यात आला. यामध्ये खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये अन्नधान्य ८१.६० लाख टन, खरीप गळीत धान्य ५६.७१ लाख टन, कापूस ७१.२० लाख गाठी व ऊस ११३९.३३ लाख टन इतके उत्पादन झाले आहे. यंदा राज्याचे खरीप हंगाम २०२२ मधील लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४६.८५ लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४२ लाख हेक्टर, सोयाबीन पिकाखाली ४६ लाख हेक्टर, भात १५.५० लाख हेक्टर, मका ९.५० लाख हेक्टर, कडधान्य पिकाखाली २३ लाख हेक्टर क्षेत्र आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी १७.९५ लाख क्विंटल बियाणे आवश्यक असून महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व खासगी संस्थेकडे मिळून १९.८८ लाख क्विंटल बियाणे अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -