घरमहाराष्ट्रनिर्बंध नको असतील तर शिस्त पाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

Subscribe

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली होती. टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये राज्यातील कोरोना पार्दुर्भावाचा आढावा घेतला आहे. कोरोना पुन्हा राज्यात हातपाय पसरवत आहे. वाढत्या कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे निर्बंध नाही. परंतु अशीच कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर पुन्हा निर्बंध लागू करण्याची वेळ येईल तसेच मास्कमुक्त महाराष्ट्रात पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती करण्यात येऊ शकते.

राज्य शासन पुढील १५ दिवस लक्ष ठेवून –

- Advertisement -

या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विमध्ये त्यांनी काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील १५ दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा. मास्क वापरा, लसीकरण करून घ्या, हात धुवा व अंतर ठेवा !, असे आवाहन राज्यातील नागरीकांना केले आहे.

- Advertisement -

8 ते 10 दिवस महत्त्वाचे –

राज्यातील जनतेला पुढील ८ ते १० दिवस फार महत्त्वाचे राहणार आहेत. या दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना परिस्थितीच्या आढाव्यानुसार निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर कडक निर्बंध नको तर नियम पाळा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. शाळांबाबत महत्त्वाचा मत नोंदवण्यात आले आहे, ते म्हणजे शाळा सुरु करण्यास अडचण नाही परंतु १२ वर्षांखालील मुलांबाबत दक्ष राहावे लागणार आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -