घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

Subscribe

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने ६१ वर्धापन दिन साजरा

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणार्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तथा राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहुन अभिवादन केले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने ६१ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.

आजपासून राज्यात १८ ते ४५ वर्षांमधील लोकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. हे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. काही मोजक्या लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे सर्व वीरांना विनम्र अभिवादन केले. राज्यातील रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. गेल्या वर्षीही महाराष्ट्र दिन कोरोनाच्या सावटात गेला. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

- Advertisement -

आपल्या मागे दृष्टचक्र लागले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे. राज्यातील लोकांनी समजूतदारपणा दाखवल्याने पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन करावा लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनी शुभेच्छा दिल्या 

महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्राला सहजासहजी काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापनाही संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. सीमाभागातील मराठी गावांना महाराष्ट्रात आणण्यासाठी तसेच कोरोनाच्या महाभीषण संकटावर विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा संघर्ष आजही सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र ही दोन्ही उद्दीष्टे साध्य करील,” असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचं स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शहीद वीरांना आदरांजली वाहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी पाहिलेलं, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील समस्त मराठी गावे महाराष्ट्रात सामील करण्याचं स्वप्न अद्याप अपूर्ण असून सीमाभागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत आपला लढा सुरुच राहील, याचा पुनरुच्चारही उपमुख्यमंत्र्यांनी केला. राज्यावरील कोरोना संकटाविरुद्ध महाराष्ट्र एकजूटीनं, निर्धारानं लढत आहे. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्यभरातले लोकप्रतिनिधी, नागरिक सर्वजण जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत. या सर्व कोरोनायोद्ध्यांच्या सेवाकार्याची नोंद इतिहासात होईल, असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


हेही वाचा – खावटी अनुदान योजनेचं अनुदान वितरण, महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -