राज्यसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, राणेंचा हल्लाबोल

ठाकरेंनी आता राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल भाजप नेते नारायण राणे यांनी केला. आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

Narayan rane criticizes cm uddhav thackeray on uddhav thackeray cant sustain what Balasaheb earned

राज्यसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की झाली आहे. त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ठाकरेंनी आता राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल भाजप नेते नारायण राणे यांनी केला. आज पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. (Chief Minister uddhav Thackeray has no moral right to remain in office, says Rane)

हेही वाचा – लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होणार; राज्यसभेच्या निकालावरून नाना पटोलेंचा इशारा

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागला. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर शरसंधान साधलं जात आहे. किंग मेकर ठरलेल्या भाजपने तर शिवसेनेसह संपूर्ण महाविकास आघाडीला निशाण्यावर ठेवलं आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांनीही त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.

हेही वाचा – आमच्या हातात ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील – संजय राऊत

राज्यसभेच्या निकालावरून शिवसेनेवर निशाणा साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘राज्यसभेच्या निकालामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली आहे. संजय राऊत काटावर आले आहेत. ते आमच्या हातून वाचले. एकूण आघाडीची मते त्यांना मिळाली पाहिजेत, तेवढीही मते त्यांना मिळाली नाहीत.’

हेही वाचा भाजपने मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवत केला संप्रदायाचा अवमान…

अल्पमातात आलेल्या महाविकास आघाडीबद्दल बोलताना राणे म्हणाले की, सत्तेला १४५ मते लागतात. तुम्ही अल्पमतात आलात. त्यामुळे तुम्ही राजीनामे द्या. नैतिकता असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणेंनी केली.

बढाया मारणारे स्वतःचेही आमदार वाचवू शकले नाहीत. तुम्ही स्वचःला वाघ समजता, पण तुमची कृती शेळीचीही नाही, असंही टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडलं.