Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'मिस्टर मुख्यमंत्री नाही तर मिस्टर सत्यवादी'

‘मिस्टर मुख्यमंत्री नाही तर मिस्टर सत्यवादी’

'मुख्यमंत्री डोळे झाकून बसलेले नाहीत. ते सत्याच्या बाजूनेच आहेत. ते कोणावरही अज्ञान होऊ देणार नाही', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Related Story

- Advertisement -

बीडच्या आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अद्याप सरकारने कोणतेही भूमिका घेतलेली नाही. तसेच विरोधकांकडून संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी एकच मागणी जोर धरु लागली आहे. मात्र, त्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. याविषयी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना एका मराठी वृत्तवाहिनीने विचारणा केली असता. ‘मुख्यमंत्री डोळे झाकून बसलेले नाहीत. ते सत्याच्या बाजूनेच आहेत. ते कोणावरही अज्ञान होऊ देणार नाही. ते राज्याचे मिस्टर मुख्यमंत्री असले तरी मी त्यांना मिस्टर सत्यवादी म्हणतो’,अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

न्याय मिळाला पाहिजे

‘पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी जी व्यक्ती दोषी आहे, त्या व्यक्तीला न्याय हा मिळालाच पाहिजे. पूजाच्या कुटुंबाला देखील न्याय मिळणार. त्याप्रमाणे चौकशी देखील सुरु असून चर्चा करण्यासाठी सर्व दरवाजे देखील उघडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणावरही अन्याय होऊ देणार नाही’.

तुमच्याकडे असलेली माहिती तपास यंत्रणेला द्यावी

- Advertisement -

‘राज्य सरकारडे पूजा आत्महत्ये प्रकरणी कोणतीही माहिती नाही. पण, विरोधकांकडे याबाबत माहिती आहे. त्यामुळे विरोधकांकडे असलेली माहिती त्यांनी तपास यंत्रणेला द्यावी किंवा गृहमंत्र्यांना द्यावी’, असा सल्ला संजय राऊत यांनी मनसे नेत्या चित्रा वाघ यांना दिला आहे.

अधिवेशन उधळून लावायचा विरोधकांचा अजेंडा

‘संजय राठोड विषय घेऊन विरोधकांकडून यंदाचे अधिवेशन उधळून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या १ मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, हे अधिवेशन उधळून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे’.


- Advertisement -

हेही वाचा – चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल


 

- Advertisement -